देश विदेशप्रेरकसामाजिक

स्वस्त औषधी घराजवळच मिळणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा

स्वस्त औषधी घराजवळच मिळणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 15/8/2023 :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्य दिनी नागरिकांना मोठे गिफ्ट दिले. त्यांनी अनेक योजनांची माहिती देतानाच त्यामध्ये सुधारीत बदलाची माहिती दिली. सध्या जेनेरिक मेडिसीनमुळे (Generic Medicine) औषधोपचारावरील सर्वसामान्यांच्या खर्चात मोठी कपात झाली आहे. अनेक शहरात, गावखेड्यात स्वस्त औषधी केंद्रांमुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वांतत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरुन एक मोठी घोषणा केली. त्याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. नागरिकांना स्वस्त औषधी केंद्रासाठी दुरचा पल्ला गाठावा लागणार नाही. त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे रुग्णांची जेनेरिक औषधांसाठीची पायपीट थांबेल.
जेनेरिक मेडिकलची संख्या वाढणार
सर्वसामान्यांना स्वस्तात औषधी मिळावी यासाठी देशभरात जन औषधी केंद्राची, स्वस्त औषधी केंद्र स्थापन करण्याची योजना मोदी सरकारने सुरु केली होती. ही योजना थोड्यात कालावधीत लोकप्रिय ठरली. औषधांच्या नावाखाली राजरोसपणे होणाऱ्या लुटीला लगाम लावण्याचे प्रयत्न या माध्यमातून होत आहे. सध्या देशात स्वस्त औषधाची 10 हजार केंद्र आहेत. ही संख्या आता 25 हजार इतकी होणार आहे. त्यानंतर हा आकाड वाढू शकतो.
ज्या भागात मेडिकल नाहीत, सहज औषधे उपलब्ध होत नाही, ज्या भागात खासगी मेडिकलची एकाधिकारशाही आहे, अशा ठिकाणी जनऔषधीची ही नवीन केंद्र उघडण्यात येतील. त्यामुळे एका मोठ्या वर्गाचा औषधांचा खर्च कमी होऊन बचत होईल. त्यांची लूट होणार नाही.
औषधं असतील स्वस्त
या स्वस्त औषधी केंद्रावर लोकांना स्वस्तात औषध मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्चात किती कपात होईल याचं एक उदाहरण मांडलं. त्यानुसार, मधुमेहाच्या रुग्णाला औषधांवर एका महिन्यात 3000 रुपयांचा खर्च येतो. पण हेच औषध जनऔषधी केंद्रावर त्यांना 100 रुपयांना मिळेल. यातील अनेक औषधी स्वस्त औषदी केंद्रावर 10 ते 15 रुपयांना मिळतील.
स्वस्त औषधी केंद्रांची संख्या वाढेल
देशात मेडिकलचा खर्च जास्त वाढला आहे. उपचार आणि औषधांचा खर्च एकदम वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या बचतीवर मोठा परिणाम होत आहे. त्यांची कमाई औषधांवरच खर्ची पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी स्वस्त औषधी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. आता या केंद्रांची संख्या 10,000 हून 25,000 इतकी करण्यात येणार आहे.

वन अर्थ, वन हेल्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जग भारताच्या ‘वन सन, वन वर्ल्ड आणि वन ग्रीन’ या योजनेशी जोडल्या जात असल्याचे सांगितले. तर आरोग्य सुविधा पुरविण्यात भारत आघाडी घेत आहे. ‘वन अर्थ, वन हेल्थ’ यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर’ या मंत्रावर पण भारत काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य मिशनसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र आयुष विभागाची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.