आपला जिल्हाप्रेरक

७७ वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा

७७ वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo.9860959764.

(आकाश भाग्यवंत नायकुडे)

अकलूज दिनांक 16/8/2023 : माळशिरस तालुक्यात 77 वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. शासकीय, निमशासकीय कार्यालय, शिक्षण संस्था, सहकारी संस्था इत्यादी सर्व ठिकाणी ध्वजारोहण होऊन राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली.


उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी माळशिरस उपविभागीय कार्यालय अकलूज येथील प्रांगणात उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार उदया रघुनाथ देसाई, अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे, अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, अकलूज मंडल अधिकारी चंद्रकांत भोसले, तलाठी किसनाराव शिंदे, प्रांत कार्यालयातील कर्मचारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाचे संगीत शिक्षक विष्णू जिजाबा राजगुरू आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी ध्वजगीत गायन केले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर कार्यालयामध्ये स्वातंत्र्य सैनिक वारसदार नेताजी रघुनाथ माने, सूर्यकांत यशवंत कुरुडकर, शहीद जवान हनुमंत करडे यांच्या वीर पत्नी मोनिका करडे, यांच्यासह साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता आणि aklujvaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, विष्णू जिजाबा राजगुरू, ज्योती कुंभार, दीपक लोंढे, शशिकांत महादेव कडबाने, राजीव शरद लोहकरे, चंद्रकांत शिवदास कुंभार, इत्यादींचा सन्मान उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलूज येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील तर अकलूज पोलीस ठाणे प्रांगणात पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

अकलूज गाव कामगार तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालय प्रांगणात संयुक्तपणे मंडलाधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते, वरिष्ठ तलाठी किसनाराव शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. अकलूज नगरपरिषद मुख्य कार्यालय, उपकार्यालय माळेवाडी आणि विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल या तीनही ठिकाणी अकलूज नगर परिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती चे मुख्य कार्यालय प्रांगणात सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संचालक, सचिव राजेंद्र काकडे आणि कर्मचारी उपस्थित होते.


शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल प्रांगणात संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शिवरत्न नॉलेज सिटी मध्ये विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग महाविद्यालय, ग्रीन फिंगर्स कम्प्युटर कॉलेज, बीबीए कॉलेज यांच्या संयुक्त कार्यक्रमात डॉक्टर नितीन एकतपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज मुख्यालय प्रांगणात कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
विजयनगर-अकलूज येथील शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या कार्यस्थळी दूध संघाचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय भिलारे यांच्या हस्ते, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक रविराज इनामदार, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर येथील महर्षि संकुलाच्या प्रांगणात महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला व प्राथमिक विभाग आणि लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यांच्या संयुक्त कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सई भोरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी सभापती ॲड. नितीन खराडे, तीनही प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
सदाशिवराव माने विद्यालयात पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन कमिटी संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक अमोल फुले, सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकलूज आगारात आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांनी ध्वजारोहण केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.