प्रेरकमहाराष्ट्रमाहिती तंत्रज्ञानसामाजिक

⭕पुरंदर उपसा केंद्र – मृत्यू वाहिनी 🟣पुण्याचे शौच, सांडपाणी, घाण पाणी जाते ग्रामीण भागात

⭕पुरंदर उपसा केंद्र – मृत्यू वाहिनी

🟣पुण्याचे शौच, सांडपाणी, घाण पाणी जाते ग्रामीण भागात

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 20/7/2023 :
आम्ही पुरंदर उपसा केंद्रातून पुरंदर तालुक्यातील अनेक गावांना जाणारे पाणी तपासले असता संतापजनक व धक्कादायक माहीती कळाली.
पुणेकरांचे घरगुती सांडपाणी, कचरा प्रक्रिया न करता मुळा-मुठा नदी मधे सोडल्यामुळे नदीमध्ये प्रदूषण वाढले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ह्या नदीचे वर्गीकरण प्राधान्य क्रमांक 1 (सर्वोच्च धोकादायक वर्ग) या गटात केले होते.
ह्या नदीच्या शुद्धीकरणासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’ (जायका), केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय’ आणि पुणे महापालिकेमध्ये 23 फेब्रुवारी 2015 ला करार झाला होता. सन 2022 ला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले. तरी सुद्धा या प्रकल्पाचे काम गतीने न होता रेंगाळले आहे. ह्या प्रकल्पा अंतर्गत अकरा नवे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधले जाणार होते.
हे पाणी ह्या भागातील विविध गावे जसे दिवे, माळशिरस, राजेवाडी, पोंदे, उदाजीवाडी, सोनवरी, वणपुरी, शिनगापूर, गुरवळी, पारगाव, वाघापूर वगैरे ठिकाणी शेतीसाठी दिले जाते. ते नंतर झिरपून विहिरी, बोअर मध्ये जाऊन पिण्यासाठी वापरले जाते. काही ठिकाणी “जल जीवन मिशन” मध्ये हेच पाणी वापरतात. पावसाळ्यात ही घाण उजनी धरणात जाऊन मिळते.
आम्ही दोन्ही ठिकाणच्या (शेतीसाठीचे व पिण्याचे विहीरी मधील) पाण्याचे सॅम्पल घेऊन टेस्ट केले.
पिण्याच्या पाण्यासाठीचे आवश्यक निकष (Acceptable Limits) इंडियन स्टॅंडर्ड (मानक) BIS 10500 प्रमाणे आहेत व शेतीच्या पाण्यासाठी BIS 11624 प्रमाणे आहेत.
हे दोन्ही पाणी टेस्ट मध्ये नापास ठरले आहे. सोबत टेस्ट रिपोर्ट.
ह्या मध्ये Faecal coliform हा अत्यंत धोकादायक एलीमेंट शून्य पाहिजे. पण प्रत्यक्षात आहे 23. ज्यामुळे मुलांना जुलाब, उलट्या होऊ शकतात. काही ठिकाणी 15 मेंढरे हे पाणी पिऊन मृत्यूमुखी पडल्याची घटना झाली आहे.
ह्या प्रकल्पाच्या खर्चाचे बजेट 700 कोटी रु. वरून 5000 कोटी रु. गेले आहे. तिकडे पुणे महानगरपालिका मुळा-मुठा नदी किनाऱ्याच्या सुशोभीकरणला महत्व देत आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास विषयक (UNO – SDGs- Sustainable Development Goals) मध्ये 6 व्या उद्दिष्टात असे ठरवले आहे की सन 2030 पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे.
“स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी ही दुरावस्था. अमृत काळा मध्ये अमृत तुम्हीच प्या. आम्हाला फक्त शुद्ध पाणी द्या.”
हा ग्रामीण भागातील लोकांवर अन्याय आहे.
तुम्ही पण ह्या बाबतीत जागरूक रहा.
सोबत : रिपोर्ट्स

प्रत: पुणे महानगर पालिका
: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
: केंद्रीय जलशक्ती मंत्री
: केंद्रीय पर्यावरण मंत्री

सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे
अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.