प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत “द लाईट : ए जर्नी विदिन” चित्रपट श्रीराम चित्रमंदिर मध्ये प्रदर्शित

प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत “द लाईट : ए जर्नी विदिन” चित्रपट श्रीराम चित्रमंदिर मध्ये प्रदर्शित
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 08/03/2024 :
महिला संचलित जगातील सर्वात मोठी अध्यात्मिक संस्था “ब्रह्माकुमारीज” संस्था स्थापनेची अद्भुत कथा अर्थात संस्थापक “पिताश्री ब्रह्मा बाबा” यांच्या सत्य जीवन प्रसंगावर आधारित एक प्रेरणादायक कथा असणारा “द लाईट : ए जर्नी विदिन” चित्रपटाचे प्रसारण प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत अकलूज येथील श्रीराम चित्रमंदिरच्या भव्य बादशाही पडद्यावर 8 मार्च 2024 रोजी सकाळी दहा वाजता झाले. श्रीराम चित्र मंदिराचे मालक प्रकाश शामराव पाटील, दि. सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. माळीनगरचे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, गहिनीनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन शिरीष ताराचंद फडे, पत्रकार मिलिंद मधुकरराव गिरमे, ब्रह्माकुमारीज सेंटर, “शिवालय” संग्रामनगर अकलूज शाखेच्या संचालिका बी.के. शिवरात्री बहेनजी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने चित्रपटाच्या प्रदर्शित सोहळ्याचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी श्रीराम चित्र मंदिरातील प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. उपस्थित मान्यवरांचा सन्मान ब्रह्माकुमारीज सेंटरच्या वतीने करण्यात आला.
ज्यांनी आपल्या जीवनात महिलांचे सशक्तिकरण आणि अध्यात्माद्वारे मानवी मूल्यांबाबत जागरूकता निर्माण करून समाजात शांतता व सौहार्द प्रस्थापित करण्याचे ध्येय ठेवले, असे ब्रह्माकुमारी संस्थेचे संस्थापक पिताश्री ब्रह्मा बाबा यांच्या वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित “द लाईट : ए जर्नी विदिन” हा चित्रपट अकलूज येथील श्रीराम सिनेमागृहात दिनांक 8 ते 12 मार्च 2024 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते 11:30 या दरम्यान प्रदर्शित करण्यात येत आहे. मनुष्य आत्म्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा हा सिनेमा प्रेरणादायी असून तो सर्वांसाठी खुला म्हणजे मोफत ठेवण्यात आलेला आहे. अशी माहिती ब्रह्माकुमारीज सेंटर, “शिवालय” संग्रामनगर अकलूज शाखेच्या संचालिका बी.के. शिवरात्री बहेनजी यांनी दिली.
गॉडलीवूड व्हिडिओ निर्मित असलेल्या या चित्रपटाची कथा बी.के. जगदीश चंदर यांनी लिहिलेल्या “एक अद्भुत जीवन कहाणी” या पुस्तकातून घेतली गेली आहे. एक श्रीमंत आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी असलेल्या दादा लेखराज कृपलानी (पिताश्री ब्रह्मा) यांनी आपले आरामदायक जीवन त्यागून राज योगाच्या मार्गावर वाटचाल केली. अध्यात्माच्या या नवीन मार्गावर जात असताना त्यांनी अनेक आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागले. शौर्याने आणि धेर्याने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना त्यांनी सर्व शक्तिमान परमपिता परमात्मा “द लाईट” कडून सतत मार्गदर्शन आणि सामर्थ्य मिळाले. दादा लेखराज यांनी नश्वर देहाचा त्याग केल्यानंतर त्यांचे अध्यात्मिक ज्ञानाच्या प्रसाराचे कार्य ईश्वरीय प्रेरणेने आजही प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने जगभरात चालू आहे.
अशी अद्भुत प्रेरणादायी कथा जी तुमची आंतरिक जीवन जागृत करते आणि जीवनाचा मार्ग प्रकाशित करते. यासाठी थ्री डी मध्ये असलेला हा चित्रपट सर्वांनी सिनेमागृहात येऊन पहावा, असे आवाहन बी.के. शिवरात्री भहेनजी यांनी केले आहे.हा चित्रपट पाहण्यासाठी बुकिंग करण्यासाठी संपर्क नंबर याप्रमाणे आहेत. मोबाईल नंबर 97 62 65 90 58 / 98 81 63 84 69 / 9923549548 तसेच फोन नंबर (0 21 85) 22 68 63 या नंबर वर संपर्क साधावा असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलेले आहे.