इ. स. 1957 पर्यंत खान्देश महाराष्ट्राच्या नेतृत्व स्थानी होता!

इ. स. 1957 पर्यंत खान्देश
महाराष्ट्राच्या नेतृत्व स्थानी होता!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 986095
(पूर्वार्ध )
अकलूज दिनांक 7/8/2023 :
स्वातंत्र्य पुर्व काळात भारत देश हां खेड्याचा देश होता. हां देश कृषीप्रधान देश होता. भारताची अर्थ व्यवस्था मुख्यत्वे कृषी उत्पन्नावर आधारीत होती. म्हणून गांधीजीं म्हणत खेड्याकडे चला. त्या काळात खेडी स्वयंपूर्ण होती. 80% समाज खेड्यात वास्तव्य करून होता. म्हणून गांधीजींनी आग्रह धरला कीं, काँग्रेस पक्षाच 50 व अधिवेशन खेड्यात घ्या.
काँग्रेस पक्ष हां स्वातंत्र्य पुर्व काळात केवळ राजकीय पक्षच नव्हता तर ती भारतीयांची स्वातंत्र्य लोक चळवळ होती. आताच्या काँग्रेस पक्षाची तुलना त्या काँग्रेस सोबत करू नका. गांधीजींचा खेड्यात काँग्रेस अधिवेशन घेण्याचा जो आग्रह होता, त्यावर डॉ राजेंद्र प्रसाद, पंडीत जवाहरलाल, नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, आचार्य कृपालानी यांनी शंका उपस्थित केली कीं, खेड्यात काँग्रेस अधिवेशन घ्यायला हरकत नाही पण अधिवेशनासाठी संपूर्ण भारत देशातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी येतील. त्यांना लागणारी एवढी मोठी यंत्रणा उभी करू शकेल असं खेड भारतात कुठे दिसत नाही बापूजी. त्यावरं मुंबई राज्य काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शंकर देव उभे राहिले आणि म्हणाले, “आमच्या मुंबई राज्यातून दोन प्रस्ताव आले आहेत. एक जळगाव आणि दुसरा सातारा. त्यातून राज्य कार्यकारणीनीने सर्वं बाबीचा विचार करून, साताऱ्याचा प्रस्ताव नाकारून, जळगाव जिल्ह्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. मी त्यानुसार जळगाव जिल्ह्याचे नेते धनाजी नानाजी चौधरी यांना सोबत घेऊन आलो आहे. तिथल्या परिस्थिती बद्दल तेच आपल्यासी बोलतील.”
महात्मा गांधीजी यांनी मग धनाजी नानाजीं चौधरी यांना बोलण्यास सांगितले. त्यावर धनाजी चौधरी म्हणाले,
“बापूजी खान्देश हां समृद्ध संपन्न प्रदेश आहे. तेथील प्रत्येक तालुक्यात किमान 5 गाव तरी अशी निघतील कीं, जीं अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन सुरळीत पार पाडून देतील. पण मी खिरोद्याचा रहिवाशी असल्यामुळे मी या साठी माझे गावा जवळील फैजपूर हे खेडेगाव सुचवीत आहे. या गावात अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन भरवा. आम्ही खान्देशी लोक आपली उत्तम बडदास्त ठेवू. जेवण, नाष्टा, चहा पाणी, झोपण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था कुठेही काहीच कमी पडणार नाही. बापूजी गर्व नाही पण भरपूर आत्मविश्वास आहे. आमच्या खान्देशी लोकांवर भरोसा आहे. म्हणून आम्ही ही जबाबदारी स्वीकारत आहोत. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या.”
बापूजींचा त्यांच्या वचनावर विश्वास बसला. सर्वं कार्यकारिणीने फैजपूर गावाच्या प्रस्तावाला एक मुखी संमती दिली. त्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शंकर देव यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले. तर धनाजी नानाजी चौधरी यांच्याकडे सर चिटनिस पदाची जबाबदारी दिली. प्रत्येक्ष कामाला सुरवात करण्यापूर्वी महात्मा गांधी यांनी फैजपूर येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार व्यवस्था केली. गांधीजी रेल्वेने फैजपूर येथे पोहचले. गांधीजीं तो परिसर बघून खुश झाले. रात्री ते धनाजी नानाजी चौधरी यांच्या घरी खिरोद्याला मुक्कामी राहिले. फैजपूर ते खिरोदा हां प्रवास गांधीजींनी बैल गाडीतून केला.
बाकी पुढच्या भागात बघू या.
क्रमश:
बापू हटकर