प्रेरकमहाराष्ट्रलेखसामाजिक

श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट आंबेघर (कोयना) : अध्यात्मिक मार्गातुन व्यसनमुक्ती, विनामुल्य सेवा

श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट आंबेघर (कोयना) : अध्यात्मिक मार्गातुन व्यसनमुक्ती, विनामुल्य सेवा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

पेठ वडगांव दिनांक 19/6/2023 :
दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. प्रत्येक गावात दारूच्या व्यसनात आहारी गेलेले अनेकजण चांगले सुशिक्षित नागरिक पहायला मिळतात. सोडवायची इच्छा असते पण मार्ग सापडत नाही अशी अवस्था झालेली असते. अशासाठी कोयनानगर, आंबेघर येथील नाना महाराज यांनी अध्यात्मिक मार्गातुन व्यसनमुक्तीचा मार्ग दाखविला आहे. यासाठी हवी फक्त श्रध्दा व मनाची इच्छाशक्ती.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण सर्व जणांना माहिती आहेच. कोयनेपासुन अलीकडे ४ किमी अंतरावर आंबेघर येथे एका लहानश्या टेकडीवर नाना महाराजांनी स्वामी समर्थ यांचा एक मठ स्थापन केला असुन येथे ते अध्यात्मिक स्वरूपात दारूच्या व्यसनी लोकाना समुपदेशन करून मोफत धार्मिक नैतिकद्वारे एक माळ घालुन व्यसनमुक्त होण्याचे नैतिक बंधन घालुन, शपथ घेऊन व्यसनी लोकाना माळ घालुन दारूचे व्यसन सोडवतात. ही माळ गळ्यामध्ये घालण्यासाठी प्रत्येक गुरूवारी हिंदुच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीय अमरावती, अकोला, नगर पासुन ते गोवा कर्नाटक येथुन लोक येत असतात.


🔹ना अगरबत्ती ना कापुर ना नारळ
विशेष म्हणजे येथे अगरबत्ती, कापुर, नारळ काहीही लागत नाही. केवळ व्यसनी माणसाची इच्छा शक्ती, विश्वास, नैतिकता, व परमेश्वावर असणारी श्रध्दा याद्वारे व्यसनमुक्ती केली जाते.
दारूचे व्यसन सोडवण्यासाठी जगात कोणतेही औषध नाही. मात्र केवळ समुपदेशाने, मार्गदर्शनाने माणसाचे विचार बदलवल्याने दारूचे व्यसन सुटू शकते. हे आंबेघर ता. पाटण जि सातारा येथील नाना महाराज यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल’ म्हणतात ना तसे व्यसनाधीनमुक्त होण्याची आदर्श संकल्पना राबवित अध्यात्मिक मार्गाने आजवर जवळपास १५ लाख लोक दारूच्या व्यसनातुन मुक्त झाले आहेत.
जे पहिला पेग घेतात, त्यापैकी १५% व्यसनी होतात. त्यामुळे चॉईस राहतच नाही. दारू पिण्याचे स्वातंत्र्य हे मृगजळ आहे. खरे स्वातंत्र्य केवळ दारू न पिण्याचेच आहे.सुरुवात जरी मौज म्हणून झाली तरी नंतर १० टक्के लोकांमध्ये ती शरीर आणि मनाची गरज बनते. दारू पिण्यासाठी प्रत्येकाची सुरुवात होण्याचे कारण वेगळे असेल, व्यक्ती म्हणून तो वेगळा असेल पण प्रत्येकाच्या अध:पतनाची कहाणी मात्र जवळपास सारखीच असते. दारूमुळे अनेकांची घरे उध्वस्त होतात. घरातील मुलांवर व्यवस्थित संस्कार होत नाहीत. स्रियांवर अत्याचार होतात. त्यामुळे त्यांचे जीवन असुरक्षित राहते. व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर खालील प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात.
दर गुरूवारी आंबेघर येथे अक्षरश जत्रा भरल्यासारखी गर्दी जमलेली असते. यासाठी माळ घालणाऱ्या व्यक्तीने त्या दिवशी उपवास धरून सकाळी ७ ते ९ यावेळेत नाव नोंदणी करायची असते. हॉलमध्ये शेडगे महाराज प्रवचन देतात हे प्रवचन दोन तासाचे असते. यानंतर क्रमाने प्रत्येकास श्री स्वामी समर्थ व शिवशंकर यांना साक्ष ठेऊन गळ्यामध्ये माळ घातली जाते. यानंतर त्या माळकऱ्याने पुढील चार गुरूवार उपवास करून येथे येऊन दर्शन घ्यायचे असते. असे पाच गुरूवार झाले नंतर त्याने आपल्या घरी सत्यनारायण पुजा घालायची असते.नंतर त्याने फक्त गुरूवार सोडुन अन्य दिवशी मांसाहार केला तरी चालतो.
बाहेरगावच्या लोकांसाठी येथे बुधवारी संध्याकाळी हजर राहिले तर राहणेची सोय करण्यात आली आहे. दर बुधवारी येथे रात्री ८ ते ९:३० पर्यन्त प्रसाद असतो.
नाना महाराजांच्या मुळे अस्सल दारूचे व्यसनाधीन असलेले अनेकजण केवळ अध्यात्मिक समुपदेशाने दारूच्या व्यसनातुन मुक्त झाले. व संसारात रमले आहेत.
____
संपर्क :

श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट

रासाटी-आंबेघर, (कोयनानगर) ता पाटण, जि सातारा

मो. नं. 9404293310,
7588970249,
9404477160,
9011877916,
9011350812,
7798349884,
व्यसनमुक्ती साठी दर गुरूवारी उपवास करणे.

🔸एस. टी बससाठी – कोल्हापूर ते चिपळूण सकाळी ८ वाजता आहे, ती आंबेघर येथे थांबते.

– पत्रकार अनिल पाटील, पेठवडगाव
9890875498

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button