ताज्या घडामोडी

रानभाजी – अळंबी

रानभाजी – अळंबी

शास्त्रीय नाव : Agaricus bisporus
इंग्रजी नाव : Mushroom

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/09/2024 : अळंबी किंवा भूछत्र ही रानभाजीतच मोडतात. हल्ली बाजारात बटन मशरूम्स, ऑईस्टर मशरूम्स बाराही महिने उपलब्ध होतात. पण वाईल्ड मशरूम्स फक्त पावसाळ्यात मिळतात. खवय्यांची पसंती आणि आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या दुर्मिळ रानभाजी मध्ये अळंबीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. अळंबीच्या काही प्रजाती या पाऊस सुरू झाल्यावर लगेच मिळतात, तर काही उशीराने उपलब्ध होतात. सहसा नजरेला न सापडणारी ही रानभाजी वारूळ, कुजलेला पालापाचोळा, जळलेली जमीन अशा ठिकाणी सापडते. चविष्ट असणाऱ्या अळंबीत प्रोटिन, फॉलिक ऍसिड असते. अनेक ठिकाणच्या जंगल परिसरात पांढरीशुभ्र अळंबी उगवतात. मात्र अळंबी शोधताना ती काळजीपूर्वक तपासून शोधावी लागतात. कारण किंचित पिवळसर, पिवळीधमक, किंचित काळसर, ओंडक्यांवर उगवणारी अळंबी विषारी असतात. विषारी अळंबी खाणे आरोग्यास धोकादायक आहे. अळंबी हे एक उच्च प्रथिन अन्न असून ते पाचक आहे. आहारात समतोल राखण्यासाठी व शारीरिकदृष्टय़ा शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व मूलद्रव्ये अळंबी मध्ये समाविष्ट असतात. अळंबी मध्ये ब-१, ब-२, क जीवनसत्त्वे; खनिजापैकी पालाश, कॅल्शियम, सोडियम, स्फुरद, लोह इत्यादी भरपूर प्रमाणात आहेत. अळंबी मध्ये शरीर वाढीसाठी आवश्यक अमिनोआम्ले असतात. क जीवनसत्त्वामुळे स्कव्‍‌र्ही रोग, नायसिन; पेयेनिक आम्लामुळे त्वचेचे, खनिजांचा दात, हाडे यांच्या वाढीसाठी व चांगल्या दृष्टीसाठी याचा उपयोग होतो. अळंबीनमध्ये पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प प्रमाणात असल्याने उच्च रक्तदाब असणाऱ्यांना गुणकारी व आरोग्यवर्धक आहे. तसेच कर्करोग, हृदयरोग, अर्धागवायू, संधीवात, मधुमेहासाठी तर वरदानच आहे. तसेच हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी, त्वचारोग, वजन कमी करण्यासाठी व आम्लपित्तावर अळंबी उपयुक्त ठरते. यामुळेच अळंबीचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे ठरते.
पाककृती
# साहित्य – अळंबी, कांदे २, आल लसुण मिरची कोथिंबिर पेस्ट १ चमचा, टोमॅटो १ ते २, हिंग, हळद, मसाला १ ते २ चमचे, तेल, चविनुसार मिठ, अर्धा चमचा गरम मसाला.
# कृती – प्रथम अळंबी सोलुन घ्यायच्या. सोलून घ्यायच्या म्हणजे ह्या थराथरांच्या आवरणांच्या बनलेल्या असतात. सगळ्यात वरचे आवरण काळपट असते ते काढून टाकायचे. नंतर त्याचे बारीक भाग करून चांगले धुवुन घ्यायचे. भांड्यात तेल गरम करुन कांदा शिजत घालायचा. शिजला की त्यात आल्-लसुण, मिरची, कोथींबीरची पेस्ट टाकुन थोडं परतवायचं. त्यानंतर हिंग, हळद, मसाला टाकुन परतवून अळंबीच्या फोडी टाकायच्या व ढवळून शिजत ठेवायचे. अळंबीला पाणी सुटते. साधारण १०-१५ मिनीटे शिजल्यावर त्यात वरुन टोमॅटो, मिठ व गरम मसाला घालायचा. टोमॅटो शिजला, पाणी आटले की गॅस बंद करायचा.
# टिप – अळंबी मध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, म्हणून भाजीत आजीबात पाणी घालू नये.
*अळंबी सावजी स्टाईल
# साहित्य – ७५० ग्रॅम गावठी अळंबी, २०० ग्रॅम कांदे, १ टेबल स्पून आले-लसूण पेस्ट, १ कप तेल, १ टेबल स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून हळद, २ टी स्पून सावजी मसाला, मीठ चवीनुसार, १ टी स्पून कोथिंबीर चिरलेली.
# कृती – सर्वप्रथम आळंबी चार-पाच पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी, व बारीक चिरून ठेवावी. तसेच कांदा सुद्धा बारीक चिरुन तयार ठेवावा. आता कढई मध्ये जवस तेल गरम करायला ठेवून कांदा घालून परतावा, कांदा सोनेरी होत आला की आले-लसूण पेस्ट घालून पुन्हा छान परतावे. कढईतले आले लसणा सोबत चे मिश्रण खमंग परतल्यावर त्यामध्ये तिखट व हळद ॲड करून थोडेसे हलवून चिरलेली अळंबी ऍड करावी. व परतत तेलावरच भरपुर होऊ द्यावी. ८०% वाफेवर शिजलेली अळंबी मध्ये आता सावजी मसाला, मीठ व गरजे इतकेच पाणी घालून दोन-तीन उकळ्या येऊ द्याव्यात. गॅस बंद करुन चिरलेली कोथिंबीर भाजीवर पसरवावी. झणझणीत सावजी अळंबी तयार होईल. थोडावेळ झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यावे.

संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.