ताज्या घडामोडी

“आता यात काय राहिले”

“आता यात काय राहिले”

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30 ऑगस्ट 2024 
सर्व व्यवसायात अगर नोकरीत अतिशय ‘असुरक्षित’ व्यवसाय म्हणजे वकिली व्यवसाय होय
जावे ज्याचा वंश
या व्यवसायात पेन्शनची व्यवस्था नाही. कोणतेही भत्ते नाहीत तसेच दरमहाच्या उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नाही. पक्षकाराकडून पैसे वसूल करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. ना घर भाडेभत्ता ना वाहन भत्ता. वैद्यकीय उपचार कोणत्याही किमतीला मोफत नाही. कोणतीही सवलत नाही. फक्त शेतकऱ्यांच्या सारखे रामभरोसे उत्पन्नावर वकील वर्ग जगत असतो.
आपण दोन-तीन टक्के वकील यांच्याकडे पाहतो व त्यांची श्रीमंती त्यांचे उत्पन्न याच्याशी सामान्य वकिलांची तुलना करतो. पण असे नसते. न्यायव्यवस्थेमध्ये इतका आर्थिक दृष्ट्या असुरक्षित घटक कोणताही नाही आणि वकिलांना बॅन्का कर्जे, क्रेडिट कार्ड सुध्दा देत नाहीत.
जावे ज्याचा वंशा
आज हा विषय मांडायचे कारण म्हणजे काही न्यायाधीश अचानक पणे एखाद्या कामाबद्दल आपले मत पक्षकारांच्या पुढे धाडकन मांडून रिकामे होतात
माझ्या एका मित्राचे वकील मित्राचे पक्षकारावर खोटी कागदी कागदपत्रे केली व फसवणूक केली म्हणून केस झाली होती. या पक्षकारास अटकेपासून वाचवण्यासाठी त्या वकील मित्रांनी काय काय पापड पेलले हे त्यालाच माहीत.
सर्वसाधारणपणे पक्षकार हे काम सुरू झाले की फी देण्याची उदारता दाखवतात. जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत पक्षकार शक्यतो फी देण्याची टाळाटाळ करतात. या वकील मित्राच्या बाबतीत असे घडले त्या फसवणूक करणाऱ्या व कागदपत्रे खोटी करणारे आरोपीस माननीय कोर्टाने दोषारोपपत्रात तुझ्याविरुद्ध गुन्हा सिद्ध होणे अवघड आहे तुला सोडून देणे भाग आहे.
“आता यात काय राहिले नाही” असे अतिउत्साहात सांगून टाकले. त्या क्षणापासून तो आरोपी आपल्या वकिलाने आपल्या कामात घेतलेली सर्व कष्ट ,श्रम विसरला आणि वकिलाकडे जाण्याचे टाळू लागला. त्याच्या लक्षात आले आता न्यायाधीश जर म्हणतात तुझ्या केस मध्ये काही नाही तर वकिलाला का हिंगलून विचारायचे
वकिलाच्या फी व सन्मानाची ऐशीतैशी
न्यायाधीशांच्या एका वाक्याने वकिलाची फी पण बुडली व सन्मानही बुडाला. असे वकिलांच्या अपरोक्ष आरोपीला तुझ्या कामात काही दम नाही असे म्हणून त्या न्यायाधीशांनी काय साधले मला समजू शकत नाही.
मा लऊळसाहेबांचा किस्सा
सुमारे 25 वर्षापूर्वी कोल्हापूरला लऊळकर नावाचे सेशन जज्ज होते. त्यांच्यापुढे माझे एका आरोपीचे अपहरण व बलात्काराचा आरोप असलेले कामकाज सुरू होते. पहिले चार साक्षीदाराचा मी अतिशय कसून उलट टपास घेतला त्यामुळे माननीय कोर्टाचे मत असे झाले
“आता यात काय राहिले”
असे त्यांनी मला व सरकारी वकीलाना असे विचारले त्यावर मी म्हणालो सर या कामात प्रोफेशनल डिफिकल्टी आहे म्हणजे थोडक्यात फी आलेली नाही.
यावर माननीय लऊळकरसाहेबांच्या लक्षात आले आता जर आरोपीला समजले की आपल्या कामात काही राहिलेले नाही तर तो वकिलांना फी बाबतीत टांग मारल्या शिवाय राहणार नाही.
त्यावर साहेबांनी आरोपीला समोर बोलावून घेतले व त्यास कडकभाषेत “काय वाटेल ती कामे करता काय या कामात शिक्षा कितीआहे तुला माहित आहे का?” असा प्रश्न विचारला यावर आरोपी मान खाली घालून उभारला
पुढील तारीखेपूर्वी आरोपी माझ्या ऑफिस वर आला व साहेब तुमची सर्व फी देतो पण मला यातून सोडवा असे म्हणून जी फी ठरली होत की त्याने आणून दिली. मा. लऊळकरसाहेबांच्या चाणाक्षपणामुळे माझे आर्थिक नुकसान टळले. सांगायच्या हेतू काय
वकील वर्गास कोणतीही आर्थिक गॅरेंटी नसल्याने अति उत्साही पिठासन अधिकारी यानी त्यांच्या पोटावर लाथ मारू नये.
(वकिली कथा व व्यथा या आगामी पुस्तकातील पक्षकारांचे नमुने या प्रकरणातील संक्षिप्त भाग)

ॲड.अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.