ताज्या घडामोडी

एक कटू सत्य……..❗

एक कटू सत्य……..❗

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/03/2025 : अंत्यसंस्कार झाल्यानंतरचे सत्य…
थोड वाईट वाटेल पण हेच सत्य आहे आणि हेच सत्य राहील.
काही तासांत रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल.
तुमचे घरचे माणसं पहिले काही दिवस नातेवाईकांनी आणून दिलेले जेवण जेवतील व नंतर हळूहळू पूर्वस्थितीत येतील.
नातवंडे धावत-खेळत राहतील.
तुमच्या निघून जाण्यानंतर काही लोक तुमच्याबद्दल काही टिप्पणी करतील!
दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील, तर काहीजण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील.
काही दिवसांनंतर, तुमचे घरचे तुम्ही कमावलेली संपत्ती कशा रितीने वाटून घ्यायची याची चर्चा सुरू करतील.
येत्या काही दिवसात, तुम्ही मेला आहात हे माहीत नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात.
दोन आठवड्यांत तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील.
महिनाअखेरीस तुमचा जोडीदारही कॉमेडी शो पाहून हुळूहळू हसायला लागेल.
तुम्ही ज्या पदावर होता त्या पदावर आता दुसरा कोणीतरी व्यक्ती असेल.
प्रत्येकाचे जीवन सामान्य होईल.
आपण कशासाठी जगतो आणि मरतो यात काही फरक नसतो.
हे सर्व इतक्या सहजतेने, सहजपणे, कोणतीही हालचाल न करता घडते.
या जगात विस्मयकारक गतीने तुमचे विस्मरण होईल.
दरम्यान, तुमची प्रथम पुण्यतिथी, प्रथम वर्षश्राद्ध मोठ्या दिमाखात केले जाईल, तुम्हाला न मिळालेले खाद्य पदार्थ लोकांना खायला मिळतील.
मोठमोठ्या महाराजांची किर्तने,प्रवचने मोठ्या दिमाखात होतील.
अतिवेगाने वर्षे उलटून जातील आणि आता तुमची कोणालाही आठवण येणार नाही.
आता सांगा
लोक तुम्हाला सहज विसरण्याची वाट पाहत आहेत.मग तुम्ही कशासाठी धावत आहात?
तुम्हाला कशाची काळजी आहे ?
योग्य आणि नैतिक मार्गाने संपत्ती कमवा, गरजेपेक्षा जास्त संपत्ती जमा करू नका.
आयुष्य फक्त एकदाच मिळते, फक्त ते निस्वार्थी भावनेने व प्रेमळ मनाने जगा.
इतरांपेक्षा स्वतः ला श्रेष्ठ समजून इतरांना कमी लेखू नका, त्यांचा अपमान करू नका.
इतरांचे प्रपंच मोडकळीस आणण्याचे पाप करु नका, त्याचा परिणाम आपल्याही कुटुंबांवर होऊ शकतो.
आयुष्यात पद, सत्ता एका विशिष्ट वयानंतर येते आणि एका विशिष्ट वयानंतर निघून जाते.
होय, एक गोष्ट…
आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला निरपेक्ष प्रेमाने मदत करा, तो तुमची नेहमी आठवण ठेवेल.
आपल्या अस्तित्वाचा,पैशाचा अहंकार सोडा.
सत्कर्म करत रहा हेच खरे जीवन आहे.

पत्रकार दिनेश हसबनीस
नागपंचमीचे शिराळा

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button