आपला जिल्हासहवेदना
स्व.शितल भालचंद्र पराडे- पाटील यांचे निधन, उद्या दशक्रिया विधी

स्व.शितल भालचंद्र पराडे- पाटील यांचे निधन, उद्या दशक्रिया विधी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 2/8/2023 :
माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव येथील शितल भालचंद्र पराडे पाटील यांचे मंगळवार दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आजारपणातील औषधोपचार सुरू असतानाच निधन झाले. गुरुवार दिनांक 27/7/2023 रोजी सकाळी अस्थि सावडण्याचा विधी बाभुळगाव स्मशानभूमी येथे झाला. स्वर्गीय शितल यांचे पश्चात आई, वडील, 1 भाऊ,1 बहीण, दोन चुलत भाऊ, एक चुलत बहीण असा परिवार आहे.
स्व. शितल भालचंद्र पराडे पाटील यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक 3/8/2023 रोजी सकाळी सात वाजता बाबुळगाव स्मशानभूमी नजीक चंद्रभागा नदी तिरावर सुरू होईल.


