ताज्या घडामोडी

लाख छुपाए छुप ना सकेगा

लाख छुपाए छुप ना सकेगा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

प्रासंगिक संकलन:

🔰 भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, झेलम एक्सप्रेस मधून संध्याकाळी 6:16 वा. आग्राराजा की मंडी येथून

दिनांक 15/06/2024 :

कोणताही क्रिमिनल गुन्हा कधीही लपत नाही खुनाला वाचा फुटते असे आपण ऐकत आलो आहोत
आज ना उद्या गुन्हेगार कायद्याच्या चरकात सापडतोच व पिडीताला यां ना त्या प्रकारे न्याय मिळतोच गुन्हा लपवण्याचे हजारो मार्ग आहेत पण गुन्हा लपला जात नाही तो उघडकीला येतो.
जर गुन्हा लपवायचा प्रयत्न केला त्यातून नवीन गुन्हा तयार होतो. त्याला कायदेशीर भाषेत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न असे म्हटले जाते.
हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास नवीन गुन्हा होतो व या नवीन गुन्ह्यामुळे जुना गुन्हा पण उघडीकला येतो.
एकदा काय झाले माझे पक्षकार शेजारच्या जिल्ह्यामध्ये त्यांचे चार चाकी वाहन घेऊन गेले होते. एका वळणावर त्यांना एक मोटर सायकल स्वार येऊन धडकला ती मोटरसायकल जोरात होती ती खाली पडल्याने त्यातील पेट्रोल ने पेट घेतला व हा अल्पवयीन मोटर सायकल स्वार चांगल्याच रीतीने भाजला गेला. त्या माझ्या पक्षकाराचा मला फोन आला मी त्यांना सांगितले तुमचे वाहन तिथेच पार्क करा व तुम्ही ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला जा व अपघाताची इत्यंभूत माहिती पोलिसांना द्या.
नंतर पोलीस तपास झाला माझ्या पक्षकारांचा वाहन चालवण्यात निष्काळजीपणा नव्हता हे दिसून आले त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाच्या पालकांनी कांगावा करून भरपाईचा दावा दाखल केला तो पण नाकारला गेला.
सांगावयाचा हेतू काय आहे
जर माझ्या पक्षकारांनी तेथून पळून जायचा प्रयत्न केला असता तर ते या सर्व कायद्याच्या कटकटीत अडकले असते.
*पोर्श कार कांड
आज हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे पुण्यातील अल्पवयीन मुलांनी चालवलेली पोर्शे कार व केलेला अपघात त्याला लपवण्याचा करण्यात आलेला प्रयत्न त्यामध्ये राजकारणी व काही पोलीस अधिकारी यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले असावे. त्यातून अनेक जण या गुन्ह्यामध्ये या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच पुढे आले त्यांच्यातून काही गुन्हे घडले. सर्वच पकडले गेले. त्यातून पबची लायसन्स तपासली गेली पुण्यासारख्या शहरात काही शेकड्यात विनापरवाना पब आहेत हे ऊघडकीला आले. अनेक डॉक्टर, महिला, नातेवाईक, वडील, आजोबा हे सर्वजण गुन्हा लपविण्याच्या प्रयत्नात अटक झाले.
जर अपघातानंतर तो मुलगा आपल्या पालकांना घेऊन जर पोलीस स्टेशनला गेला असता तर जास्तीत जास्त त्याला बाल गुन्हेगार — बाल गुन्हेगार सुद्धा म्हणत नाहीत विधी संघर्षीत बालक म्हणून त्याच्यावर कारवाई झाली असती. चांगल्या वर्तणूकीचा बॉण्ड घेऊन त्याची सन्मानाने सुटका झाली असती. पण असे न करता गुन्हा लपविण्याचा प्रयत्न झाला.
मला साधार भीती वाटत आहे काही कायदे तज्ञ पण पुढील काळात गुन्हा लपविण्यातस मदत केली म्हणून गजाआड जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने हिट ऑर्डर रन केस मध्ये केलेल्या सुधारणा मोडून काढण्यात काही राजकीय पक्ष यांचा सहभाग होता. आता सर्वांना हिट ऑर्डर रन केस बद्दल कडक कारवाई करावी असे वाटू लागले आहे.
अनेक वेळा कळत न कळत हातून एखादा गुन्हा घडत असतो. धाडसाने होणाऱ्या कायदेशीर कारवाईस सामोरे गेलो तर असा अनेक कायदे आहेत पहिला गुन्हा म्हणून सौम्य दृष्टिकोन वापरला जातो त्यामुळे गुन्हा लपवण्यासाठी गुन्हा हे तंत्र चुकीचे आहे.

ॲड अनिल रुईकर
98 232550 49
इचलकरंजी

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.