ताज्या घडामोडी

विजय उत्सव व वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

विजय उत्सव व वाढदिवसानिमित्त
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, झेलम एक्सप्रेस मधून 11:21 वा. भोपाळबिना जंक्शन येथून

बिना जंक्शन दिनांक 15/06/2024 :

जोगवडी नजिक मुकदममळा (ता. बारामती) येथे खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांचा विजय उत्सव व खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांचे सुपा परगना प्रमुख सुनील राजेभोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.


प्रारंभीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले.
अक्कलकोट संस्थानचे राजासाहेब श्रीमंत मालोजीराजे भोसले, खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांचे सुपा परगना प्रमुख सुनील राजेभोसले व मान्यवर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा वह्या, पेन, कंपास असे शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवरांकडून विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व मार्गदर्शन करण्यात आले. राजा साहब मालोजीराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना ‘ वाढदिवसाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे म्हणजे कलागुणांचा कर्तुत्वाचा गुणगौरव करणे आहे. वाढदिवसानिमित्त असे कार्यक्रम करणे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे या कार्यक्रमाचा आदर्श घेऊन समाज बांधवांनी असे उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांनी कोणाच्याही दबावाला, आमिषाला ,मोबाईलच्या अति वापराला ,व्यसनांना बळी न पडता अभ्यास व स्वतःच्या विकासासाठी लक्ष द्यावे’ कारण तुम्ही उद्याचे राष्ट्राचे भविष्य आहात असे मनोगत व्यक्त केले.


वडगाव निंबाळकर, सोमेश्वर, लोणी भापकर, मुर्टी, मोरगाव परिसरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या व बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेले हे यश अभिमानास्पद असल्याने सुनील राजेभोसले यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अमित राजेभोसले इंडस्ट्रीजच्या वतीने विद्यार्थ्यांना सत्कार रूपाने शैक्षणिक साहित्यांची मदत करण्यात आली. तसेच सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.
याप्रसंगी पिलाजी राजे शिर्के यांचे वंशज अमित राजे शिर्के, सुरसिंह जाधवराव, माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, दूध संघाचे माजी चेअरमन पोपटराव भोसले, छोटा पुढारी घनश्याम दरोडे, अंजली ठोंबरे, शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल दोरगे पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ राहुल शेलार, इतिहास संशोधक मंगेश गावडे पाटील,पुण्यातील गुलशे तालिम चे मालक भुषणदादा जाधव,
सुषमा आव्हाळे, दर्शना पठारे, वंदना मोडक, साधना मोडक, अलका सोनवणे, सुनीता गाडे, अनिता चव्हाण, मंदाबाई आव्हाळे उपसरपंच आव्हाळवाडी,मिनाकाकी सातव, कामिनी ताकवले, अमित राजेभोसले, तानाजी कोळेकर, भाऊसाहेब कोळेकर, आदेश दोरगे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज दादा जाधवराव, सूत्रसंचालन श्रीकांत पवार व आभार डॉ. सतीश राजे भोसले यांनी मानले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.