ताज्या घडामोडी

एकनाथराव, अभ्यासक्रमात मनूस्मृती आणताय तर विधानसभेत ‘घटकुंचकी’ खेळ चालू करा !

एकनाथराव, अभ्यासक्रमात मनूस्मृती आणताय तर विधानसभेत ‘घटकुंचकी’ खेळ चालू करा !

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

अकलूज दिनांक 31/05/2024 :

राज्य सरकारने अभ्यासक्रमात मनूस्मृतीचा व रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. एकनाथ शिंदे सरकारने हा प्रस्ताव आणला यात काही विशेष नाही. त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षाही नाहीत. गुलामांच्या खांद्यावर त्यांच्या स्वकीयांना मारण्यासाठी नेहमीच बंदूका ठासल्या जातात. त्यांच्याकरवी त्यांचीच माणसं, त्यांचीच संस्कृती मारली जाते. त्यासाठीच गुलाम वापरले जाातात. म्हणूनच “कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ” ही म्हण प्रचलित झाली आहे. समाजात असे कुऱ्हाडीचे दांडे अनेक आहेत. अशा अनेक दांड्यांनी शिवरायांना विरोध करत मोघलांना ताकद दिली होती. सध्या सत्तेत असलेल्या काही दांड्यांनी गोतास काळ ठरेल असा निर्णय घेतला आहे. मनूस्मृती सारख्या विकृत आणि विषवल्लीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय गोतास काळ ठरणारा आहे. एकनाथ शिंदेंचे सरकार ही नमकहरामी करायला निघाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्तेसाठी व पैशासाठी शरण गेलेले गुलाम दुसरे निर्णय काय घेणार आहेत ? संघ आणि फडणवीस कसे खुष राहतील ? याची दक्षता विद्यमान सरकार घेत आहे. त्यातूनच असले फडतूस निर्णय घेतले जात आहेत. एकनाथरावांनी अभ्यासक्रमात मनूस्मृतीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेताना किमान महाराष्ट्र सरकारने तर हजारवेळा विचार करायला हवा होता. बाकी कुठल्या राज्याने किंवा इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्याने असा निर्णय घेतला असता तर काहीच वाटले नसते. पण महाराष्ट्राच्या सरकारने असा प्रस्ताव आणावा ही खेदाची बाब आहे. कारण याच महाराष्ट्रात घटणेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनूस्मृती जाळली होती. जी मनूस्मृती जाळायच्या लायकीची आहे तिचा समावेश अभ्यासक्रमात करायला निघालेल्या गाढवांना काय म्हणावं ? बाबासाहेब मनूस्मृती जाळतात याचा अर्थ काय ? शिंदेच्या डोक्यात मेंदू नावाचा अवयव असेल तर त्यांनी जरूर विचार करावा. सत्ता ही लोक कल्याणासाठी असते. कुणाचे तर पाय चेपण्यासाठी किंवा कुणाला तर खुष करण्यासाठी वापरायची नसते. एकनाथराव तळातून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या नावावर असली नमकहरामी नोंद होवू नये, त्यांनी गोतास काळ ठरणारे निर्णय घेवू नयेत असं मनापासून वाटत. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हा निर्णय का घेतला नाही ? याचा विचार एकनाथ शिंदेंनी जरूर करावा.
पुस्तकावर जीवापाड प्रेम करणारे, पुस्तकासाठी स्वतंत्र घर बांधणारे बाबासाहेब मनूस्मृती जाळतात याचा अर्थ काय होतो ? या येड्यांना किमान बाबासाहेबांनी मनूस्मृती जाळल्याचे भान राहिले नाही का ? ज्या मनूस्मृतीने इथल्या माणसाला गुलामीगिरीत खितपत ठेवले होते. तिच गुलामगिरी रूजवणारी व शोषण करणारी व्यवस्था नव्याने आणणार आहात काय ? दिपक केसरकर म्हणतात, “अभ्यासक्रमात समावेश करावयाचा आहे तो श्लोक चांगला आहे !” दिपकराव तुम्ही एक सांगता का ? विष्ठा चांगली आणि वाईट असू शकते काय ? तुम्हाला जर कुणी म्हणाले, ही विष्ठा आहे आणि सगळी वाईट नाही. त्यातली अर्धी खाल्ली तर चालेल ? दिपक केसरकर त्यातली अर्धी चांगली आहे म्हंटलेली विष्ठा खातील काय ?
मनूस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करणारे गुलाम आहेत. प्रबोधनकारांच्या पध्दतीने सांगायचे झाले तर ते भटाळलेले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ? विशेष म्हणजे ज्यांची आडनावं शिंदे-पवार अशी आहेत त्यांनी हा प्रस्ताव आणावा ? ही नक्कीच खेदाची बाब आहे. सदरचा निर्णय फडणवीस, जोशी, कुलकर्णी किंवा देशपांडे नावाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला असता तर हरकत नव्हती. पण वैचारिक सुंता झालेल्या लाचार गुलामांना वैचारिक बांधिलकी कोठून येणार ? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारला अभ्यासात मनूस्मृती हवीच आहे तर त्यांनी विधानसभेत घटकुंचकीचा खेळही सुरू करावा. पावसाळी अधिवेशनापासून एकनाथरावांनी विधानसभेत घटकुंचकीच्या खेळास प्रारंभ करावा. राज्यात सध्या अघोषित पेशवाईच आहे. सरकारी खर्चाने भट ‘भोजनावळ’ आणि ‘घटकुंचकी’ चालू करावी. एकनाथरावांना ‘घटकुंचकी’ चा खेळ माहित नसेल तर त्यांनी त्याची माहिती फडणवीसांना विचारावी. किरिट सोमय्यांच्या शुभहस्ते या खेळास प्रारंभ केला तर अधिक उचित होईल. एकनाथरावांना हा विषय माहित असण्याचा संबंध नाही. पेशवाईच्या काळात पेशव्यांच्या दरबारात मधोमध एक रांजण ठेवला जात असे. सदर रांजणात पुण्यातल्या पेशव्यांच्या स्त्रीयांची अंतरवस्त्रे ठेवली जात. पेशवे किंवा दरबारातले इतर काही मात्तबर उठायचे आणि सदर रांजणातील अंतरवस्त्रे बाहेर काढायचे. ते वस्त्र ज्या महिलेचे असेल तिच्यासोबत सर्वासमक्ष संभोग केला जायचा. एकनाथरावांचे सरकार पेशवाईच्या विचारानेच सुरू आहे. मनूस्मृती त्यांना हवी असेल तर घटकुंचकीचे खेळही चालू करावेत.
विधानसभेत घटकुंचकीचा खेळ चालू केला तर सगळे लोकप्रतिनिधी वेळेत कामकाजाला हजर राहतील. विधानसभेत फालतू वादही होणार नाहीत. मुलं मनूस्मृती कधी शिकतील तेव्हा शिकतील. विधानसभेचे सर्व सदस्य लगबगीने येतील. शांतपणे कामकाज करतील. किरिट सोमय्या पण विशेष अतिथी म्हणून हजर राहतील. त्यामुळे येणा-या पावसाळी अधिवेशनात नवा कायदा करत घटकुंचकीचा खेळ विधानसभेत चालू करायला हरकत नसावी.

दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, 9561551006

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे. मुंबई

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.