श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/03/2025 : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूज येथे दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला . या दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी डॉ.अमित घाडगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . तसेच विविध स्त्रियांसंदर्भातील कवितांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये कु. जागृती ऐवळे, कु. संचिता दीक्षित व कु. अमृता मगर या विद्यार्थिनींनी कवितांचे सादरीकरण केले. तसेच तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी स्त्री शिक्षणासंदर्भात व बालविवाह प्रतिबंधाबाबत घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती केली.
महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयशीला मनोहर तसेच अध्यक्षीय समारोप डॉ. भारती भोसले यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. संचिता दीक्षित व कु. जागृती ऐवळे यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे डॉ. ऋषी गजभिये, डॉ. राजश्री निंभोरकर व प्रा. खंडप्पा कोरे व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.