शैक्षणिक उद्दीष्ठ साधण्याचा प्रयत्न करा – स्वरूपाराणी मोहिते पाटील

शैक्षणिक उद्दीष्ठ साधण्याचा प्रयत्न करा – स्वरूपाराणी मोहिते पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 17/7/2023 : मोबाईलचा अनावश्यक वापर हा विद्यार्थ्यांच्या जिवनातील बहुमुल्य वेळ वाया घालवतो तर जंकफुङस् हे शरीरात हानिकारक तत्वांचा भरणा करतात. म्हणुन जे अपायकारक आहे त्याला वेळीच आवर घालून आपले शैक्षणिक उद्दीष्ट साधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका व प्रताप क्रीङा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी विद्यार्थिनींना केले.
पुर्व उच्च प्राथमिक व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार कु.स्वरुपाराणी मोहीते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आदीती थोपटे (राज्यात ९ वी), अवंती धायगुङे (तालुक्यात ३ री), समृध्दी दोडके (तालुक्यात ४ थी), स्मरणिका साठे ( तालुक्यात ७ वी), संस्कृती पवार (तालुक्यात ८ वी), पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्वेता रणखांबे (तालुक्यात २ री), पौर्णिमा भांगे (तालुक्यात ३ री) यांनी यश संपादन केले. विद्यार्थिनींचे मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका, विभागप्रमुख मुक्ता मिसाळ, अनुराधा कांबळे, संदीप शिंदे यांचाही सन्मान कु. मोहीते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सुनिता वाघ, पर्यवेक्षक यशवंतराव माने देशमुख व इतर शिक्षक उपस्थित होते.