प्रेरकसंपादकीयसामाजिक

भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

भारतरत्न
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 5/9/2023 : डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ होते. डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने ‘राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट’ हा पुरस्कार ठेवला आहे.
राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?’ कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.
“भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवतो, तो खरा शिक्षक.”असे विचार असलेल्या
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस….
त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूत्तनी या गावी झाला. प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले व एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला.
मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले. 1939 मध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली.
1931साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली. त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली.
1952साली भारताचे पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. त्याचप्रमाणे 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते.
1957च्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला .
13 मे 1962 साली डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 1967 साली निवृत्त झाले. त्यानंतर आंध्रराज्यातील तिरूपती या गावी 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.