आपला जिल्हादेश विदेशप्रेरकमहाराष्ट्रसामाजिक

अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाची रविवारी पंढरीत बैठक

अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाची रविवारी पंढरीत बैठक

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

पंढरपूर प्रतिनिधी दिनांक 02/09/2023 :
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेची पंढरपूर येथे उद्या रविवारी ३  सपटेंबर रोजी एक दिवसीय महत्वपूर्ण बैठकीचे अयोजन करण्यात आले आहे. ही बैठक पंढरीतील एलआयसी आफिस मागे असणाऱ्या योगा भवन येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह.भ.प.मुकुंद महाराज व ह.भ.प.माधव महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नानासाहेब पाथरकर, प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे, टोणी , राजपाल, ज्वालाप्रसाद, रेखाताई वर्मा, महादेव खटावकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
या बैठकीला देशातील १३ राज्यातील व महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या बैठकीत शिंपी समाजातील सामाजिक, राजकिय सांस्कृतिक, शैक्षणिक, तसेच विविध विषयांवर सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत सदर बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
यासाठी राज्य प्रदेश संघटक मनोज भांडारकर, प्रदेश प्रिसद्धीप्रमुख संतोष मुळे, पंढरपूर समाज अध्यक्ष गणेश उंडाळे, आनंद बंगाळे, दिनकर पंतगे, दिलीप बंगाळे, प्रशांत माळवदे, अनिल जांवजाळ, ज्ञानेश्वर वडे हे अथक परिश्रम घेत आहेत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.