आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीप्रेरक

द ग्रीन फिंगर्स स्कूल अकलूजच्या विद्यार्थ्यांची विभागीय शालेय वुशू क्रीडास्पर्धेसाठी निवड

दग्रीन फिंगर्स स्कूल अकलूजच्या विद्यार्थ्यांची विभागीय शालेय वुशू क्रीडास्पर्धेसाठी निवड

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 01/09/2023 : द ग्रीन फिंगर्स स्कूल अकलूजच्या विद्यार्थ्यांची विभागीय शालेय वुशू क्रीडास्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य उमाकांत बराल यांनी अकलूज वैभवला सांगितली.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामीण जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडल्या. यामध्ये १७ वर्षे वयोगट मुली- कु. आर्या कदम – प्रथम(५२ किलो), कु. अनुष्का जवाहिरे – प्रथम (६० किलो), आर्या सरडे द्वितीय (४५किलो), कु. सृष्टी गायकवाड – द्वितीय (५६ किलो), कु. कार्तीकी जाधव – द्वितीय (६०किलो),१७ वर्षे वयोगट मुले- चि. नागराज निकम- प्रथम(५२किलो), चि. श्रेयश मुळीक- द्वितीय (६० किलो), चि. ऋषिकेश जाधव- द्वितीय(४० किलो), चि.प्रज्वल राऊत- द्वितीय (५२ किलो), चि.ओम गोडसे – तृतीय (७५ किलो), चि.विराज शिंगाडे- तृतीय (४० किलो) क्रमांक मिळवून या सर्व खेळाडूंची विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रशिक्षक बाबू बळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, उपाध्यक्षा सौ.सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते- पाटील, सचिव धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील, विश्वस्त कु.विश्वतेजसिंह मोहिते- पाटील, स्कूलचे चेअरमन नितिन महादेवराव इंगवले- देशमुख, प्राचार्य उमाकांत बराल, प्रशासकीय अधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.