महाराष्ट्रलेख

नारपारच पाणी बीडलां देणार मग खान्देशलां कांय देणार?

नारपारच पाणी बीडलां देणार
मग खान्देशलां कांय देणार?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 30/8/2023 :
27 ऑगस्टलां बीड मध्ये उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार गटाची मोठी सभा झाली. मां शरदचंद्र पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा झाली असं म्हणतात. कारण काहीही असू दे पण त्या सभेत खान्देशाच “कारण” म्हणजे “उत्तरक्रिया” करायचे ठरले.
त्या सभेत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, एक लाख कोटी रुपये खर्च आला तरी पर्वा नाही, पण नारपारचे पाणी गोदावरी खोऱ्यात उतरवून बीड जिल्हा जल संपन्न करू!
मग खान्देशच काय वाटोळ करू म्हणता? खान्देश यांच्या खिज गणतीतच नाही.
या पूर्वी उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात जल संपदा मंत्री असलेले जयंत पाटील म्हणाले होते, नारपारचे पाणी आम्ही मराठवाड्यालां देऊ!
तेंव्हाही खान्देश गप्प बसला. त्याच्याही आधी 24 नोव्हे 2006 रोजी गोदावरी खोऱ्यासाठी मांजरपाडा1 आणि तापी-गिरणा खोऱ्यासाठी मांजरपाडा2 धरणं मंजूर केली. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री मां छगन भुजबळ साहेब होते तर अर्थमंत्री अजितदादा पवार होते. यांनी सांगितले दोन्ही धरणाची काम एकाच वेळी सुरु करून एकाच वेळी पूर्ण करू आणि दोन्ही धरणं एकाच वेळी कार्यान्वित करू. पण दुर्दैवान तस झालं नाही. मांजरपाडा1 धरणं बांधून तयार झाले आहे, तें कार्यान्वितही झाले आहे. तर मांजरपाडा2 वर एक वीट सुद्धा नाही ही शुद्ध फसवणूक आहे.
तापी नदी वरील पाडळसरे धरण 1996 साली मंजूर झाले. हे काम सुरु होऊन, आता 27 वर्ष झाली तरीही, हे धरणं अपूर्ण अवस्थेत आहे. आतां तर त्याची मूळ उंची कमी करून अर्ध्यावर आणली आहे.
मांजरपाडा1 धरणं 2006 लां सुरु होऊन 2019 ला म्हणजे 13 वर्षात पूर्ण होत आणि मांजरपाडा2 हे निव्वळ कल्पनेतील धरणं असत. तिकडे 27 वर्षात पाडळसरे धरणं अपूर्णच राहत हां दोष कोणाचा आहे?
नारपार धरणं योजना ही मूळ भाऊसाहेब हिरे यांच्या स्वप्नातील योजना आहे. ती नार-गिरणा जोड योजना होती. ती मूळ योजना बाजूला ठेवून हे पाणी भलतीकडे वळवायचं सुरु केले आहे. जल लवादानें केम डोंगरावरीलं सर्वात जास्त पाणी तापी-गिरणा खोऱ्यालां दिलं होते. पण मां नरेंद्र मोदी गुजराथचे मुख्यमंत्री व मां अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना दोघांत करार होऊन, या पाण्याचे फेर वाटप करून तापी-खोऱ्याच पाणी कमी करून गुजराथलां पाणी वाढवून दिले. असे का केले काही कळत नाही. आता जे पाणी आमच्या नशिबी आलं होत तेही मराठवाड्याकडे वळवायचं काम सुरु आहे. तसें तें काम आता सोपं झालं आहे. मांजरपाडा1 तयार आहे. त्याची उंची फक्त वाढवून नारपारचे सर्वं पाणी गोदावरी खोऱ्यात ओतले कीं, झालं मराठवाड्याच काम. तिकडे भव्य जायकवाडी धरणं उभं आहे. तें कधी भरत नाही. हे नारपारचे पाणी जायकवाडी धरणात पडले कीं, मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटतो. पण मग खान्देशच कांय? सरकारला खांदेशचे वाळवंट करायचे आहे का?
तापी-गिरणा खोरे म्हणजे कोण?
धुळे, जळगाव, नंदुरबार हे तीन जिल्हे आणि उत्तर नाशिक जिल्हा ज्याला सध्या कसमादे म्हणतात. एवढा सर्वं भाग म्हणजे तापी-गिरणा खोरे.
हक्काच्या पाण्यासाठी या सर्वं परिसरातील सर्वं जनतेला एकत्र यावं लागेल. त्यासाठी मोठं आंदोलन उभ करावं लागेल. तापीचा दक्षिण किनारा तें चांदवडचा घाट हां सर्वं परिसर दुष्काळी पर्जन्य छायेतील प्रदेश आहे. या भागातील शेतकऱ्याना कायम दुष्काळाचा सामना करावा लागतो. या भागात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. उन्हाळ्यात अनेक गावांत कुठे महिन्यात तर कुठे 15 दिवसांत प्यायचं पाणी येत तिथं शेतीला कसं पाणी मिळणार? पाणी नाही म्हणून शेती सिंचन नाही, उद्योग कारखानें नाहीत. त्यामुळे भयंकर बेरोजगारी आहे. लोक पोटापाण्यासाठी, सुरत, मुंबई, पुणे या भागात स्थलांतरीत होत आहेत. गावं ओस पडत आहेत. लोकसंख्या घटल्यामुळे शहादा-दोंडाईचा, यावलं, पारोळा हे तीन विधानसभा मतदारसंघ रद्द झाले. आता तरी डोळे उघडा. आणि पाण्यासाठी संघर्ष करा.
आम्ही काही खान्देशी लोकप्रतिनिधीसी नारपार बद्दल चर्चा केली. त्यांनी सांगितले हे काम खूप खर्चाचे आहे सोडून द्या तो विषय. ही असली माणसं! यांना कुठे खिशातून खर्च करायचा आहे? सरकारी तिजोरी भक्कम आहे महाराष्ट्र वापरतो आपणही वापरू. तें नारपार सोडून द्या म्हणतात, तर तुम्हीचं त्यांना सोडून द्या. नव्या उमेदीचे नवे चेहरे निवडून द्या. खांदेशाच्या सीमेवरून उकाई, सरदार सरोवरच पाणी पाकिस्तान सीमेवरील कच्छ भुज मध्ये 700 किलोमीटर जाऊ शकत. मग नारपारच पाणी फक्त 34 किलोमीटरंचा बोगदा करून गिरणेत का येऊ शकत नाही? त्यासाठी इच्छा शक्ती हवी. सर्वं काही होत. पण जनतेचीच इच्छा शक्ती मेली असेल तर काहीच होऊ शकत नाही. अजितदादा म्हणतात एक लाख कोटी खर्च आला तरी बेहत्तर पण नारपारचे पाणी बीड मध्ये आणू! अशी जिद्द हवी. ती तुमच्यात कधी तयार होईल?
चला उठा युद्ध करा!
पाण्याचा संघर्ष करा!

यूही शोर मचाना मेरा मक्सद नही,
यह सुरत बदलनी चाहिए|
हिमालंयसे कोई गंगा निकलनी चाहिए||
मेरे दिलंमे ना सही देरे दिलं मे,
पर आग कहीना कही लगनी चाहिए||

घरे घर संदेश सोनाना खान्देश||

बापू हटकर

तां कं – अजितदादानं बीड म्हांनं भाषण आयक माले रातभर जप लागनी नही. तीन वाजता उठनू नी हाऊ लेख लिखा. तुमले कशी इतली निघोरी जप लागस कांय समजत नही भो?

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.