धार्मिकप्रेरकलेख

देवभूमी कान्हदेश! रामायणातील खान्देशी स्थळ व व्यक्ती!

देवभूमी कान्हदेश!
रामायणातील खान्देशी
स्थळ व व्यक्ती!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

भाग दुसरा

अकलूज दिनांक 30/1/2023 :
आयोध्येच पुराण खूप मोठं आहे. पण इथे आपण फक्त रामकथा म्हणजे रामायण बघू या. रामायणाची सुरवातचं खान्देशातून होते. पहिल्या भागात आपण वाल्या कोळ्याची कथा पाहिली. रामायणातील एकूण 70% घटना या खांदेशात घडल्या आहेत. कोणत्या त्या पाहू.
मुक्ताईनगर तालुक्यात हरताळे नावाचे गाव आहे. या गावात एक तलाव आहे त्याचं नावं हरताळे आहे. हर म्हणजे शिव त्या शिवाचा तलाव तो हरताला त्याचा अपभ्रश हरताळे. दशरथ राजा दंडकारण्यात शिकारीला आला आणि त्याने या हरताळे तलावाच्या काठा वरील एका झाडावर मचाण तयार केले. रात्रीच्या वेळी या मचाणावर शिकारीसाठी तो घात लावून बसला. तिथे मध्ये रात्रीच्या वेळी श्रावण बाळ पाणी भरायला आला. त्याची चाहुल राजाला लागली. त्याला वाटलं कोणी श्वापद पाणी प्यायला आल असावं, म्हणून त्याने आवाजच्या दिशेने लक्षवेध घेतला आणि त्यात श्रावणाची हत्या झाली.
राजानें श्रावणाच्या आई वडिलांना सर्वं हकीगत सांगितली. ती ऐकून पुत्र विरहाने त्यांचा मृत्यू झाला. मरता मरता त्यांनी दशरथ राजालां शाप दिला. तुझाही आमच्या सारखा पुत्र विरहानें मृत्यू होईल. हां शाप दशरथाला वर ठरला. त्याला मुलबाळ होत नव्हतं. त्याला दिलेला पुत्र वियोगाने मृत्यू येईल हां शाप खरां ठरायचा असेल तर त्यासाठी दशरथालां पुत्रप्राप्ती होणे आवश्यक होते. पुत्र होण्यासाठी त्याला हरताळे येथे शाप मिळाला. हे राम जन्माचे भाकीत, खान्देशातील हरताळे इथे घडले. ही आहे रामायणाची सुरवात आहे.
दशरथ राजाने श्रावणाची हत्या झाली तिथे तिघांच्या चिता पेटविल्या. त्या जागेवर श्रावण बाळाच मंदिर बांधले. तें आजही अस्तित्वात आहे. या श्रावणाच्या मंदिरा जवळ एक गाव वसले. त्याचे नावं श्रवणगाव. या श्रवणगावाचा पुढे अपभ्रश वरणगाव असा झाला आहे. तिथेच श्रावण बाळाचे तें मंदिर आहे.
पुढे दशरथालां चार पुत्र झाले. दंडकारण्यात विश्वामित्रला यज्ञ करायचा होता. पण राक्षस त्यात विघ्न आणित म्हणून संरक्षणासाठी विश्वामित्र यांनी राम लक्ष्मण यांना आश्रमात आणले होते. त्यांनी येतानाच रस्त्यात त्राटीका मारली हा प्रसंगही दंडकारण्य म्हणजे खान्देशातील आहे. नंतर आश्रमात जाऊन राम लक्ष्मण यानी विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण केले. त्यात अनेक राक्षस मारले गेले. याच वेळी जनकराजानें गोदावरीच्या काठावर यज्ञ करून सीतेचे स्वयंवर योजले होते. तें स्वयंवर रामाने जिंकलें. त्या वेळी रावणही हजर होता. लग्नाचा वांगनिश्चय दंडकारण्यात झाला. नंतर लग्न जनकपुरी नेपाळ येथे झाले. दशरथाची चार मुलं यांचे विवाह जनकाच्या चार मुलीसी झालें.
पुढे राम, सीता, लक्ष्मण दंडकरण्यात वनवासात आले. इथे ऋषीं मुनींनी त्यांचं स्वागत केलं. शबरीनी बोर दिली ती याच भूमीत. नंतर त्यांनी पंचवटी येथे झोपडी बांधून संसार सुरु केला. इथेच सुर्पनखेंचे नाक कापले. नाक म्हणजे नाशिका. त्यावरून तिथल्या शहरांच नावं नाशिक पडले. इथेच मायावी मारीच राक्षसाने सोनेरी हरणाचं रूप घेतले. राम लक्षण हरणाच्या मागे गेल्यावर रावणाने इथूनच सीता चोरून नेली. त्यावेळी इथेच जटायू रावणाला आडवा आला. त्या दोघात घनघोर युद्ध झाले आणि त्यात जटायू मारला गेला.
हनुमानाचा जन्म सुद्धा दक्षिण खांदेशात त्रेम्बकेश्वर येथे अंजनी पर्वतावर झाला. याच पर्वतावर राम हनुमान भेट झाली. नंतर हनुमान रामाला सुग्रीवाकडे घेऊन गेला. त्याची किश्किंधा नगरी इथेच असावी. इथेच सुग्रीव वालीच युद्ध झालं. रामाने लपून वालीवर बाण चालवला त्यात वाली मेला. सुग्रीव राजा झाला. त्यांनीच सीतेचा शोध लावला. सुग्रीव, हनुमान आणि वानर नसावेत. वननर असावेत तें. म्हणजे आदिम जमात. हे सर्व रामायाण दंडकारण्यात घडले आहे.
पुढे युद्ध लंकेत झाले. रामाचा त्यात विजय झाला. त्यांना बिभीषण याने पुष्पक यान दिले. त्यात बसून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान अयोध्येकडे निघाले. वाटेत पुन्हा दंडकारण्य म्हणजे खान्देश लागला. चोपडा परिसरातून पुष्पक यान जात असताना त्यांच्या कानावर राम नामाचा जप ऐकू आला. रामाने यान खाली उतरवायची आज्ञा दिली. जिथं यान उतरलं त्या जागी एक ऋषीं तप करत होता. त्याच्या सर्वांगाला कोडं आले होते. त्याला कुष्ठ रोग झाला होता. त्याचे नावं शरभंग ऋषीं होते. त्या राम भक्ताला रामाने जवळ घेतला. त्याचा रोग बरा व्हावा म्हणून जमिनीवर बाण मारला. त्यातून गरम पाणी घेऊन पाताळ गंगा भुईवर प्रकट झाली. त्या पाण्यात आंघोळ करताच शरभंग ऋषींचा रोग बरा झाला. तो गरम पाण्याचा झरा आजही चोपडा तालुक्यात आहे त्याला “ऊनपदेव” म्हणतात. म्हणजे ऊनपाण्याचा देव तो ऊनपदेव होय.
पुढे राम अयोध्येत गेला. त्याचा राज्याभिषेक झाला. सर्वत्र आनंद उत्सव साजरा होतो. एक दिवशी ती धोब्याची घटना घडते. म्हणून मग राम सीतेला पुन्हा दंडकारण्यात सोडायला सांगतो. त्यावेळी सीता गरोदर असतें. अशा परिस्थितीत वाल्मिक ऋषीं सीतेला आपल्या आश्रमात नेतो. पोटाच्या पोरी सारखा सीतेचा सांभाळ करतो. तो वालझरी आश्रम चाळीगाव येथें आहे. लव कुशाचा जन्म दंडकारण्यातील म्हणजे खांदेशातील, वाल्मिक ऋषींच्या आश्रमात होतो. त्यांचं सर्वं शिक्षण तिथेच होत. त्याचं जागी रामाचा अश्विमेध यज्ञाचा घोडा लव कुश अडवतात. घोड्याच्या रक्षणासाठी रामसेना सज्ज असतें. तीच नेतृत्व शत्रुघ्न आणि हनुमान करतात. त्यांच्यासी लव कुशाच युद्ध होत. हनुमाना सहित राम सेनेचा पराभव लव कुश याच खांदेशच्या भूमीत करतात. एवढे सर्व 70% रामायण हे खान्देशमध्ये घडले आहे. याचा आपल्याला सार्थ स्वाभिमान असला पाहिजे. आपली भूम ही देवभूमी आहे याचा आपल्याला गर्व असला पाहिजे.

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.