ताज्या घडामोडीदेश विदेशप्रेरकमाहिती तंत्रज्ञान

चांद्रयान-३ मोहिमेत भारताला मोठं यश, चंद्रावर आढळलं ऑक्सिजन, सल्फर अन् लोखंड;

चांद्रयान-३ मोहिमेत भारताला मोठं यश, चंद्रावर आढळलं ऑक्सिजन, सल्फर अन् लोखंड;

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 30/87/2023 :
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’नं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास रचला. १४ जुलै रोजी चांद्रयान-३ चं प्रक्षेपण झालं होतं. ४० दिवसांचा प्रवास करून चांद्रयान-३ चे ‘विक्रम’ लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. यानंतर ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हरने बाहेर येत संशोधनाला सुरूवात केली आहे. आता चांद्रयान-३ बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
चांद्रयान-३ मोहिमेत भारताला मोठं यश हाती आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर ऑक्सिजनसह काही मुलद्रव्ये आढळून आली आहेत. ‘प्रज्ञान’ रोव्हवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी ( एलआयबीएस ) उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर इन-सीटू मोजमाप केलं. तेव्हा हा शोध लागला आहे.
‘प्रज्ञान’ रोव्हरला संशोधनावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर ( एस ) असल्याचं आढळून आलं. तर, हायड्रोजनचा ( एच ) शोध घेतला जात असल्याचं ‘इस्रो’नं सांगितलं आहे.
‘इस्रो’नं ट्वीट करत सांगितलं की, “रोव्हरवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपने प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सल्फर ( एस ) आढळून आलं. अल्युमिनियम ( एआय ), सल्फर ( एस ), कॅल्शियम ( सीए ), लोखंड ( एफई ), क्रोमियम ( सीआर ), टायटॅनियम ( टीआय ), मँगनीज ( एमएन ), सिलिकॉन आणि ऑक्सिजन ( ओ ) आढळलं आहे. हायड्रोजनचा ( एच ) शोध सुरू आहे.”

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.