ताज्या घडामोडी

अकलूज येथे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

अकलूज येथे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 16/9/ 2024  सर्व जगाला अमन, शांती, एकता, बंधुता, भाईचारा , समतेचा संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अकलूज शहर मुस्लिम समाज व मदिना मस्जिद काझी मोहल्लाच्या वतीने मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या जयंती च्या जुलूस मिरवणूक काझी मोहल्ला येथून प्रारंभ झाला हा जुलूस पुढे नगरपरिषद कार्यालय ,दत्त चौक, हनुमान मंदिर, बागवान मोहल्ला, आंबेडकर चौक ,जुने एसटी स्टँड, गांधी चौक ,विजय चौक, शिवापूर पेठ, मार्गे परत काझी मोहल्ला येथील अकलाई विद्यालयाच्या प्रांगणात सांगता झाली.

तत्पूर्वी या जुलुस मधील अबाल वृध्द तरुण आणि सहाभागी झालेल्या सर्वांना जागोजागी आईस्क्रीम, सरबत, मिठाई ,बिस्किट, इत्यादींचे वाटप करण्यात येत होते यानंतर पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील अकलूज चे माजी सरपंच –किशोर सिंह माने पाटील भावी आमदार उत्तमराव जानकर अकलूज ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच- पांडुरंग भाऊ देशमुख तसेच हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते या पैगंबर जयंतीची औचित्य साधून अकलूज शहर मुस्लिम समाज व काझी मोहल्ला मदिना मस्जिद च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी एडवोकेट वजीर शेख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच अकलूज आणि परिसरातील गणेशोत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ ,आंबेडकर जयंती उत्सव समिती, अण्णाभाऊ साठे उत्सव समिती महात्मा फुले जयंती उत्सव समिती, धनगर समाज उन्नती मंडळ ,वीरशैव समाज व इतर समाजातील मंडळाच्या अध्यक्षांचा सन्मान व उपस्थित पत्रकार बांधव तसेच समाजातीला दोन मुलींनी यश संंपादन करुन अभियंतापदी निवड झाल्या बद्दल आमादारअकलूज येथे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न रणजितसिंह मोहिते पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यांचा पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला याप्रसंगी मदिना मस्जिद काझी मोहल्ला चे खतीब इमाम यांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे प्रवचन दिले
याप्रसंगी बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की या पैगंबर जयंती निमित्त मी उपस्थित राहिलो आणि तुर्की मध्ये कांही दिवस वास्तव्यास असलेले प्रेषित मोहम्मद यांचे पविञ निवास पाहण्याचे भाग्य मला प्राप्त झाले त्यामुळे मी भाग्यवान समजतो.
याप्रसंगी मुस्लिम बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की मुस्लिम समाजातील तरुणांनी शिक्षणाचे महत्त्व समजून शिक्षण घेऊन समाजा च्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे ही काळाची गरज असून हल्ली मुलापेक्षा मुलीच शिक्षणात प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले
तसेच याप्रसंगी उत्तमराव जानकर यांनी पैगंबर जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन मुस्लिम समाजाच्या प्रगती बाबत मार्गदर्शन केले
या जयंतीनिमित्त अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे व त्यांचे सहकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता काझी मोहल्ला मदिना मस्जिद चे ट्रस्टी पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले..

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button