आपला जिल्हाकृषी/साखर कारखाना

सहकार महर्षि कारखान्यात सिझन २०२२-२०२३ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाची संपुर्ण एफ.आर.पी. ची रक्कम रु.२५८३/- आदा

सहकार महर्षि कारखान्यात सिझन २०२२-२०२३ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाची संपुर्ण एफ.आर.पी. ची रक्कम रु.२५८३/- आदा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 28/8/2023 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर अकलूज या कारखान्याचा सन २०२२-२३ चा गळीत हंगाम दि. २४/१०/२०२२ रोजी सुरू होऊन दि.०२/०३/२०२३ अखेर १३० दिवसात १०,५६,७८० मे. टन ऊसाचे गाळप करून १०,४२,५६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सदर हंगामात बी हेवी मळी उत्पादनासह ११.१५% साखर उतारा मिळालेला आहे.
सदर २०२२-२३ च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाकरिता एफ.आर.पी. रक्कम रू.२,५८३/- प्रति में टन इतकी येत असून त्यापैकी रक्कम रु.२,४८३/- यापुर्वी बँक खातेवर वर्ग करणेत आली आहे. उर्वरीत देय प्रति मे.टन रक्कम रु.१००/- प्रमाणे दि.२८/०८/२०२३ रोजी बँक खात्यावर वर्ग केली असले बाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
केंद्र शासनाने सहकारी साखर कारखान्यामध्ये साखर विक्री किमान आधारभूत किंमत, साखर निर्यात, इथेनॉल उत्पादन व विक्री याकरिता धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे त्याचा फायदा साखर कारखान्यास झाला आहे. तसेच इथेनॉल निर्मितीचे उद्दीष्ट ठेऊन साखरेचे उत्पादन कमी केल्याने साखर उत्पादन मर्यादित झाल्याने साखरेस चांगला दर मिळणेस मदत झाली. साखरेची उचल वेळेत झालेमुळे घेतलेल्या कर्जाचे व्याजामध्ये बचत झाल्यामुळे सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी यांनी पुरवठा केलेल्या ऊसाची एफ.आर.पी. रक्कम वेळेत आदा करणे शक्य झाल्याची भावना श्री. मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली.
गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांचे हित लक्षात घेवून ऊस लागवड व परिपक्यतेनुसार ऊस तोडणी प्रोग्रॅम राबविल्याने सभासद शेतक-यांच्या ऊसाची तोड वेळेत होऊन त्याचा फायदा कारखाना, सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी यांना निश्चितच झालेला आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत- पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व – शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक – पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने- देशमुख, कालीदास मिसाळ, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, राजेंद्र भोसले, अमृतराज माने- देशमुख, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ.हर्षाली निंबाळकर, श्रीमती पुष्पा महाडीक तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व – खातेप्रमुख उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.