आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

🔵के. के. राजू यांच्या सायकल वरील सात दिवसीय कसरती 🟣कार्यक्रम पहाणयासाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद

ज्येष्ठ पत्रकार बीटी शिवशरण यांनी जतन केलेला आठवणीतील एक क्षण

🔵के.के. राजू यांच्या सायकल वरील सात दिवसीय कसरती

🟣कार्यक्रम पहाणयासाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

श्रीपूर दिनांक 26/8/2023 :
1975 किंवा 1976 साल असावे. त्यावेळी श्रीपूर येथे एसटी स्टँड पाठीमागे आता डॉ सुधीर पोफळे यांचा दवाखाना आहे त्या जागेवर केरळमधील सुप्रसिद्ध सायकलपटू के. के. राजू यांचा सायकलवरील प्रयोग सुमारे सात दिवस होता. विशेष म्हणजे के. के. राजू हे सात दिवस सायकलवरुन खाली उतरले नाहीत. सायकलवर विविध कसरती, रेकॉर्ड डान्स तसेच दुसरी सायकल दातात धरून गोल राऊंड मारायचे. एका हाताने दुसरी सायकल खांद्यावर, डोक्यावर घेऊन ते डान्स करीत. सायंकाळी दररोज पाच ते रात्री नऊ पर्यंत विविध कसरती सायकलवर प्रयोग करुन करमणूक करत. ते सायकलवर बसुन दररोज आंघोळ करत चालू सायकलवर पाण्याची घागर उचलून ते पिक्चर मधील गाण्यावर सुमारे अर्धा तास आंघोळ करत. संध्याकाळी ते सायकल वरच एक फळी ठेऊन झोपत.
अजुन एक रोमांचकारी व धक्कादायक प्रयोग त्यांचे लहान भाऊ के. के. सुधा यांनी केलेला धाडसी प्रयोग सर्वांच्या लक्षात व आठवणीत राहिला आहे. तो म्हणजे सुमारे पंधरा ते वीस फूट मोठा खड्डा खणला. त्यात त्यांनी स्वतःला जिवंत पुरुन घेतलं. पुर्ण खड्डा बुजवून घेतला व त्यावर मोठमोठी फोडीव लाकडे जसे सरण रचले जाते त्याप्रमाणे रचुन ती लाकडे पेटवली. आणि दुसरे दिवशी संध्याकाळी आठ वाजता ती जळालेली राख बाजुला काढून आत पुरलेले के. के. सुधा यांना माती बाजूला काढून त्यांना बाहेर काढले जायचे. ते हळूहळू काही वेळाने शुध्दीवर यायचे. हा प्रयोग पहाण्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो नागरिक, महिला, तरुण तरुणी तुफान गर्दी करायचे. कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक हे आवर्जून सत्कार बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाला उपस्थित रहायचे. या प्रयोगासाठी मंडप टाकलेला असायचा. दोरी बांधून गोल रिंगण आखलेले असायचे. महिलांना थांबण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. त्यावेळी एक रुपया, पाच रुपये, दहा रुपये, पन्नास रुपये अशी वैयक्तिक बक्षिसे के के राजू यांना नागरिक देत. नोटांचा हार काही व्यापारी तसेच तरुण राजू यांना घालून त्यांचे कलेचे कौतुक केले जायचे. सात दिवसांनी कार्यक्रम समारोप प्रसंगी कारखान्याचे वतीने त्यांना बक्षीस म्हणून काही रक्कम बंद पाकिटात देऊन शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यायचा. त्या सायकल प्रयोगासाठी दिवसभर स्पीकर वर त्या वेळी गाजत असलेल्या हिंदी मराठी गाण्यांची रेकॉर्ड लावली जायची. श्रीपूर, महाळुंग, बोरगाव पंचक्रोशीतील लोक संध्याकाळी पाच वाजले की श्रीपूरला के के राजू यांचा सायकलवरील प्रयोग पहाण्यासाठी एकच गर्दी करायचे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.