महाराष्ट्रराजकीयलेख

ज्येष्ठ वयोवृद्ध नेते शरद पवार हे असंबद्ध बोलतात – बी.टी. शिवशरण

ज्येष्ठ वयोवृद्ध नेते शरद पवार हे असंबद्ध बोलतात – बी.टी. शिवशरण

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

श्रीपूर दिनांक 26/8/2023 : ज्येष्ठ वयोवृद्ध नेते शरद पवार हे असंबद्ध बोलतात असे मत ज्येष्ठ पत्रकार बी.टी. शिवशरण यांनी प्रस्तुत लेखांमध्ये प्रतिपादन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व गेली साठ वर्षे सामाजिक, राजकीय, कृषी, वैधानिक, व इतर क्षेत्रातील अनेक संस्था, संघटना यांच्याशी सक्रिय सहभाग असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नैसर्गिक वय झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक दृष्ट्या वयोमानानुसार त्यांच्यातील शारीरिक अवयव त्यांना कदाचित साथ देत नसावेत. कारण हल्ली ते असंबद्ध बोलुन सामाजिक, राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देताना पहायला मिळत आहे. त्यांनी त्यांच्या युवा अवस्थेत, मध्यमवयीन कालखंडात राजकारण, समाजकारण गाजवले असेल. त्यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय क्षेत्रात अनेक सकारात्मक बाबी कार्य केले असेल. त्यांच्या यशस्वी वाटचालीत महाराष्ट्र, देश यामध्ये विकासात्मक बदल कार्य झाले असेल. पण आता त्यांचे वय वाढत चालले आहे. वाढत्या वयाबरोबर त्यांच्यातील शारीरिक अवयव त्यांना साथ देत नसल्याने ते दररोज वेगवेगळे बोलून संभ्रम निर्माण करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस मधुन बाहेर पडला आहे. त्यांनी भाजप शिंदे गटाला सत्तेत पाठिंबा देऊन ते त्यांच्या सत्तेत नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दस्तुरखुद्द पवार यांचे पुतणे अजित पवार हे जवळपास तीस ते बत्तीस आमदार घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या उतारवयात हा मोठा राजकीय, सामाजिक, कौटुंबिक मोठा धक्का त्यांना बसला आहे. पण तो धक्का ते मानायला तयार नाहीत. त्यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभा घेत राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. सभेची गर्दी, वातावरण पाहून शरद पवारांच्या अंगात उत्साह, चैतन्य, उभारी संचारत आहे. मात्र ते गर्दीत हरवत चालले आहेत. त्यांच्या पक्षात मोठी फुट, बंडखोरी झाली तरी ते म्हणतात आमच्यात फुट नाहीच. मतभेद असू शकतात. त्यांच्या या असंबद्ध बोलण्याचा लोकांनी आता नेमका काय अर्थ समजून घ्यायचा. अजित पवारांचा देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर पहाटेचा शपथविधी हा कोणामुळे झाला हे आता सर्वांच्या लक्षात यायला लागलं आहे. गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश वारी हुन आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्तर हजार कोटींचा घोटाळ्या बाबत सुतोवाच केले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे बडे मासे जेल मध्ये जाण्याची शक्यता होती. जेल मध्ये जाऊन खितपत पडण्याच्या पेक्षा कमरेचे सोडून डोक्याला लाज गुंडाळून भाजप शिंदे गटाला मिळुन पवार यांच्या शिलेदारांनी सत्तेची उबदार झुल पांघरुण घेतली. यांवर वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता नाही. येत्या काही महिन्यात शरद पवार भाजप बरोबर राजकीय युती करून ते सहिसलामत घोटाळ्याच्या चक्रव्यूह मधुन बाहेर पडले तर नवल वाटणार नाही. येत्या काही दिवसांत त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे या मोदी सरकार मध्ये केंद्रात मंत्री म्हणून शपथ ही घेतील. कारणं शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप बरोबर पुनर्वसन करण्याची तयारी व सोय केली आहे.

 

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.