रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे लवंग येथे वृक्षारोपण

रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे लवंग येथे वृक्षारोपण
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 21/8/2023 :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२३- २०२४ अंतर्गत स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , लवंग येथे वृक्षारोपण करण्यात आले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील , रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर . जी . नलावडे , कार्यक्रम समन्वयक प्रा . एस . एम एकतपुरे , प्रोग्राम ऑफिसर प्रा . एम . एम . चंदनकर आणि प्रा . एच . व्ही . कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार यावेळी अशोक , बकुळी, आंबा अशा विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी जिप. शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक , कृषिकन्या व लवंग मधील ग्रामस्थ तेथे उपस्थित होते कार्यक्रमात कृषीकन्यांनी वृक्षारोपणाची गरज , वृक्षारोपणाचे फायदे , वृक्ष संवर्धन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले तसेच वृक्षारोपण करून निसर्गाचे संतुलन कसे करता येईल व वृक्षसंवर्धन केल्याने पर्यावरणाची होणारी हानी कशी टाळता येईल याबद्दल माहिती देण्यात आली . ‘झाडे लावा देश वाचवा’ हा सामाजिक संदेश देण्यात आला