महाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्रदूषणाला जिल्हा गौणखनिज, पर्यावरण, महसूल, फाॕरेस्ट, वन विभाग जबाबदार विठ्ठल पवार राजे यांचा आरोप.

महाराष्ट्रातील प्रदूषणाला जिल्हा गौणखनिज, पर्यावरण, महसूल, फाॕरेस्ट, वन विभाग जबाबदार विठ्ठल पवार राजे यांचा आरोप.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 13/ 8/2023 :
महाराष्ट्रातील प्रदूषणाला जिल्हा गौणखनिज, पर्यावरण, महसूल, फाॕरेस्ट, वन विभाग जबाबदार आहे असा आरोप शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी केला आहे. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन खान दुर्घटनेत बेलवाडी येथील 4 कष्टकरी शहीद झाले आहेत, त्या अपघातग्रस्तंच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखाची मागणी संघटनेने केली होती, परंतु तालुक्याचे आमदार व अर्थ विभागाकडून केवळ पाच लाखाची मदत.! बेकायदेशीर खान उत्खनन क्रशर चे सहा ठिकाणचे उत्खनन करणारे भवानीनगरचे श्री सोनार, म्हसोबावाडी हद्दीतील दुसरे कंत्राटदार मोहिते आणि संबंधित म्हसूल अधिकारी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून कठोर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेने महसूल शासन प्रशासन व पोलिसांकडे केली आहे. अशी ही माहिती त्यांनी इंदापूर येथे सांगितली.
महाराष्ट्र राज्यातील प्रचंड प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, गौण खनिज उत्खनन, बेकायदेशीर केमिकल मिश्रित पेट्रोल, डिझेल, ऑइल तसेच नदी नाले मधील सोडलेल्या इंडस्ट्रियल मधील भेसळयुक्त पाणी, मैला मिश्रित पाण्यावर इटीपी प्रक्रिया न करता अत्यंत प्रदूषित पाणी थेट नदी नाल्यांमधून मुळा, मुठा, पवना, रामनदी, देवनदी, भिमा, निरा, करा नद्यांमध्ये सोडलेले भेसळयुक्त मैला मिश्रित पाणी त्यामुळे राज्यातील प्रदूषणाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामोरे जावं लागण्याची भविष्यातील शक्यता आणखी तीव्र होऊ शकते आणि त्याला राज्यातील रस्ते आणि डेव्हलपमेंट च्या नावाखाली होत असलेली बेसुमार वृक्षतोड कत्तल. शासन प्रशासनासोबतच जिल्हा राज्य वन फॉरेस्ट, वनविभाग, गौण खनिज उत्खनन महसूल आणि संरक्षण भेसळ प्रतिबंधक विभाग जबाबदार असल्याचा आरोप शरद जोशी विचारमंंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी इंदापूर येथे केला.
इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील चार शेतकरी कष्टकरी यांना गौण खनिज अपघातामध्ये शहीद व्हावे लागले त्याची सर्वस्वी जबाबदारी ही इंदापूर महसूल आणि संरक्षण विभागाची असल्याने त्यांच्यावर नागरिकांची सनद, कर्तव्यात कसूर व दप्तर दिरंगाई तसेच शासनाचे प्रचलित कायद्यानुसार, शिस्तभंगाची कठोर व निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली, गौण खनिज उत्खनन खाणींमध्ये शहीद झालेल्या कष्टकरी शेतकऱ्यांना आम्ही राज्य सरकारकडे दहा लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतीची मागणी केलेली होती. अर्थमंत्र्यांनी केवळ पाच लाख रुपयेचाच प्रस्ताव मान्य केला. का त्यांना त्यांच्या खिशातून पैसे द्यायचे होते का.? असाही प्रहार करीत, हा सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्याचा अपमान असल्याचा आरोप विठ्ठल पवार राजे यांनी इंदापूर येथे पत्रकारांसमोर बोलताना केला.
इंदापूर तालुक्याचे आमदार भरणे यांनी महाराष्ट्राचे विधान सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात काम करताना चार शेतकरी कष्टकऱ्यांच्या विहीर अपघाती मृत्यू झाल्याची खोटी माहिती विधानसभेच्या सभागृहामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांना देऊन इंदापूर तालुक्यातील जनतेचा व राज्यातील सार्वभौम सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप विठ्ठल पवार राजे यांनी यावेळी केला. त्याकरणाने त्यांनी तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या राजीनामाची मुख्यमंत्री राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लेखी मागणी केल्ल्याची माहिती यावेळी दिली. यावेळी त्यांच्या समावेत संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक फाळके तालुक्याचे अध्यक्ष दशरथ माने, हरिभाऊ कोळेकर, बारामती तालुक्याचे अध्यक्ष अरुण सोनवणे तसेच तक्रारदार शेतकरी बंधू रकटे, मारुती वनवे, निरगुडे ग्रामपंचायतचे माजी सदस्य दत्तात्रय काजळे आदी शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांनी यावेळी चारही शहीद कष्टकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व महसूल अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी यांनी सादर केलेल्या खोटा पंचनामा रिपोर्टच्या संदर्भामध्ये इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी ठेवलेल्या सुनावणीसाठी ते इंदापूर तहसील कार्यालय येथे आले होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.