ह्रदयविकार तज्ञ डॉ राऊत यांचे क्रांती दिनानिमित्त व्याख्यान

ह्रदयविकार तज्ञ डॉ राऊत यांचे क्रांती दिनानिमित्त व्याख्यान
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 9/8/2023 : अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य चळवळीतील सर्व हुतात्म्यांचे स्मरण करून आदरांजली वाहिली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिन. या दिवशी स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. या क्रांती दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य कसे जपावे, शरीर, ह्रदयाची काळजी कशी घ्यावी. कशासाठी जगायचे, प्रत्येक वेळी हुशारच असले पाहिजे असे नाही. शिक्षण घेत असताना काहीतरी करण्याची आवड असावी असे मत आपल्या आरोग्य विषयक व्याख्यानात प्रसिद्ध ह्रदयविकार तज्ञ डॉ संभाजी राऊत यांनी मांडले. तसेच अचानक ह्रदय बंद पडल्यानंतर कोणत्या प्राथमिक उपाय करावेत अशा सीपीआर ट्रिटमेंट बद्दल माहिती दिली.
प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे प्राचार्य अमोल फुले यांनी विद्यार्थ्यांना क्रांती दिनाची माहिती सांगताना भारत छोडो आंदोलन, करो या मरो चे आवाहन ९ ऑगस्ट १९४२ रोजीची ऑगस्ट चळवळीची माहिती दिली. तसेच आजचा विद्यार्थी ताणतणावात दिसतो. त्याचा परिणाम आपल्या शरिरावर, मनावर मोठ्या प्रमाणात होत असतो. काहीही झाले तरी ताणतणाव घेऊ नका असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य संजय शिंदे, व्यवसाय विभागाचे उपप्राचार्य विनायक रणवरे, शिक्षक प्रतिनिधी संजय नागणे, हेमंत पाटील, आशिफ झारेकरी, दिपाली लोखंडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. या क्रांती दिनाचे सूत्रसंचालनात क्रांती दिनाची पार्श्वभूमी व स्मरण का करायचे हे झाकिर सय्यद यांनी सांगितले.