आपला जिल्हाताज्या घडामोडीप्रेरकमहाराष्ट्र

ग्रीनफिंगर्स महाविद्यालयात “मेरी माती मेरा देश” उपक्रम व “ऑगस्ट क्रांती” दिन साजरा

ग्रीनफिंगर्स महाविद्यालयात “मेरी माती मेरा देश” उपक्रम व “ऑगस्ट क्रांती” दिन साजरा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 11/8/2023 : येथील ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी अकलूज या महाविद्यालयामध्ये ९ ऑगस्ट या दिवशी ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला . यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना “मेरी माती मेरा देश” हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत २०४७ यासंदर्भात शपथ ग्रहण करण्यात आली.”आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या, संवर्धन करणाऱ्या व राष्ट्रीय स्वाभिमान बाळगणाऱ्या विचारांचे अनुकरण करावे असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ .सुभाष शिंदे यांनी यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. मेरी माती मेरा देश अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम आयोजित राबविण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धा ,पोस्टर स्पर्धा , यासारख्या स्पर्धांचा समावेश होता. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला तसेच मेरी माती मेरा देश या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून विद्यार्थ्यांनी या अभियानास पाठिंबा दर्शवला शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील यांचे या अभियानासाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुभाष शिंदे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी व आय क्यू ए सी चे समन्वयक प्रा अनिल लोंढे , प्रा विजयानंदन कुंभार , प्राध्यापक समीर केचे , प्रा मुलाणी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.