
इ. स. 1957 पर्यंत खान्देश महाराष्ट्राच्या नेतृत्व स्थानी होता!
Akluj Vaibhav News Network. Chief Editor Bhagywant Laxman Naykude. Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India. Mo. 9860959764.
(उत्तरार्ध)
अकलूज दिनांक 7/8/2023 :
तुमचा विश्वास बसणार नाही पण सत्य आहे. 1936 च्या फैजपूर काँग्रेस अधिवेशनानें खान्देशच्या पदरात असं शिगोशिग भरून माप टाकले कीं, सर्वं पक्षाच्या नेतृत्वस्थानी खान्देशी माणूस विराजमान झाला.
मुंबई राज्यात, विदर्भ, मराठवाडा वगळून संपूर्ण मराठी भाषिक महाराष्ट्र, गुजराथी भाषिक गुजरात आणि कन्नड भाषिक उत्तर कर्णाटकं हा भाग होता. सत्ताधारी काँग्रेस पक्षात गुजराथी आमदारांचे नेते मोरारजी देसाई होते, मराठी आमदारांचे नेते भाऊसाहेब हिरे होते तर कन्नड भाषिक आमदारांचे नेते निजलिंग अप्पा होते. जनसंघ म्हणजे नंतरचा भाजपचे नेते उत्तमरावंनाना पाटील वाघळीकर होते. कम्युनिष्ट नेते श्रीपाद अमृत डांगे होते. समाजवाद्याचे नेते शिवाजी गिरधर पाटील होते. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दादासाहेब गायकवाड होते.
भाऊसाहेब हिरे हे दाभाडी मालेगावचे होते. ते मोरारजी मंत्री मंडळात क्रमांक दोनचे मंत्री होते. त्यांच्याकडे महसूल आणि कृषी खाते होते. कसेल त्याची जमीन हां कायदा भाऊसाहेबानी आणला. उत्तमरावंनानां पाटील हे चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावचे होते. पण ते कायम स्वरूपी धुळ्यात राहत होते. हे सुद्धा शरद पवार यांच्या पुलोद मंत्रिमंडळात महसूल मंत्री होते ते भाजपचे प्रमुख होते. शिवाजीराव गिरधर पाटील हे समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते होते नंतर ते काँग्रेसमध्ये जाऊन मंत्री झाले. त्यांनी शिरपूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून दिला. श्रीपाद अमृत डांगे हे कारण जि नाशिकचे होते. ते शेवट पर्यंत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख नेते होते. त्यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑडर ऑफ लेनिन मिळाला होता. दादासाहेब गायकवाड यांचं गाव आंबे ता दिंडोरी जि नाशिक.
म्हणजे विचार करा राज्यातील पाचही प्रमुख पक्षाचे राज्य प्रमुख खान्देशी होते. ही केवढी मोठी गोष्ट आहे. याच कारण 1936 च्या काँग्रेस अधिवेशनाला म गांधी पासून झाडून सर्वं राष्ट्रीय नेते हजर होते. त्यांनी खान्देशला भरपूर गुण दिले आणि सर्वं प्रमुख पक्षाच्या मुख्य जागी खान्देशी माणसांची नेमणूक केली. नाशिक जिल्हा हां दक्षिण खान्देशचं आहे. ई 1947 ते 1957 पर्यंत एकूण 10 वर्ष खान्देश मुंबई राज्याच्या नेतृत्वस्थानि होता. पुढे कोणाची दृष्ट लागली आणि खान्देश महाराष्ट्राच्या तळाला जाऊन बसला. आज खान्देशी नेतृत्वाला राज्यात कवडी मोल सुद्धा किंमत नाही. हे आपलं दुर्दैव आहे ते राजकारणातील कपट कारस्थान आहे.भाऊसाहेब हिरे मराठी आमदारांचे नेते होते. मराठी जनतेला सर्वं मराठी भाषीकांचा संयुक्त महाराष्ट्र हवा होता. तो नेहरू मोराजीलां द्यायचा नव्हता. पण या दोघांची पर्वा नं करता भाऊसाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनालां उघड पाठीबा दिला. ही गोष्ट देसाई आणि नेहरू यांना आवडली नाही. त्या दोघांनी यशवंतराव चव्हाण यांना हाताशी घेऊन भाऊसासाहेब हिरे यांना राजकारणातून संपविले. 1957 लां मोरारंजी देसाई केंद्रात मंत्री झाले. आणि त्यांच्या जागी भाऊसाहेब यांना डावलून यशवंतराव यांना द्विभाषीकं मुंबई राज्याचे मुख्यमंत्री केले. त्यावेळी ग द माळी गुरुजी आणि दादासाहेब राऊळ हे दोघे भाऊसाहेब हिरेंच्या पाठी भक्कम उभे राहिले. हिरे सोबतच माळी आणि राऊळ यांना बाजूला करण्यात आले तरी त्या दोघांनी भाऊसाहेब हिरे यांची पाठ सोडली नाही. याला म्हणतात भूमी पुत्रांची एकी! अशी एकी नंतर खांदेशात पुन्हा बघायला मिळाली नाही. खान्देश विकाससाठी आमदार कधीच एकत्र आले नाही. फक्त तिकीट देणाऱ्यासी इमान राखणारे नेतेचं खान्देशच्या नशिबी आले.
पुढे हळूहळू फैजपूर अधिवेशनाचा प्रभाव कमी होतं गेला. आणि महाराष्ट्राच्या नेतृत्व स्थानी असलेलां खान्देश तळालां फेकला गेला. याले म्हणतस आंबूनी कमाई जांबुमां घाली दिनी भो!
बापू हटकर