सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने ठरवलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे ; आ.रणजितसिंह मोहिते-पाटील
🟣महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्ज बोजा कमी करावा

🟢सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने ठरवलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे ; आ.रणजितसिंह मोहिते-पाटील
🟣महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्ज बोजा कमी करावा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
(आकाश भाग्यवंत नायकुडे)
मुंबई दिनांक 4/8/2023 :
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलतांना सोलापूर जिल्ह्यातील पीककर्ज वाटप वाटपाच्या बाबत मुद्दा उपस्थित केला.जिल्ह्यासाठी असलेले वार्षिक पतपुरवठ्याचे उद्दिष्ट आतापर्यंत ५३ टक्के पूर्ण झाले आहे.यंदा १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संबधितांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी आ.मोहिते-पाटील यांनी शासनाकडे केली.
मागील वर्षी जिल्हा वार्षिक पत धोरणानुसार बँकांनी गृह कर्ज व शैक्षणिक कर्जासाठी असलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही.शैक्षणिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी उद्दिष्टांच्या केवळ २७ टक्के शैक्षणिक कर्ज वाटप झाले असून यंदा पतपुरवठा धोरणात त्याची पूर्तता करण्यासाठी शासन काय कार्यवाही करत आहे याबाबत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सरकारकडे विचारणा केली.
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मागणीवर दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले ते म्हणाले सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण रुपये ४२५० कोटी इतका कर्जवाटपाचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यापैकी खरीप हंगामासाठी रुपये २३७८ कोटी रकमेचा लक्षांक असून दिनांक ७ जुलै, २०२३ अखेर जिल्ह्यातील एकूण ८१,०२३ शेतकऱ्यांना रुपये १२६६.१२ कोटी इतक्या रकमेचे कर्जवाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची तलाठी कार्यालयात अद्याप सातबारा वरील सोसायटी कर्जाचा बोजा कमी केलेला नाही. सातबाऱ्यावर ज्या बँकेचा अथवा सोसायटीचा कर्जाचा बोजा आहे त्यांना पुन्हा कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. या संदर्भात लवकर लवकर कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या असे ही आ.मोहिते-पाटील म्हणाले.