सोलापूर येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सी.टी. स्कॅन मशीन दुरुस्त करावी : आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा विधान परिषदेत प्रश्न

सोलापूर येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सी.टी. स्कॅन मशीन दुरुस्त करावी :
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा विधान परिषदेत प्रश्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
(आकाश भाग्यवंत नायकुडे)
मुंबई दिनांक 4/8/2023 :
सोलापुर येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय,येथे तेराशेहून अधिक आजारांवर उपचार केले जात असून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणीकरीता प्रति दिन कर्नाटक राज्यासह इतर लगतच्या जिल्ह्यांतून बाराशे ते दीड हजार रुग्ण येतात.
या रुग्णालयातील सी.टी.स्कॅन मशीन मागील तीन-चार वर्षांपासून नादुरुस्त असून औषधांचा तुटवड्यामुळे तसेच रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये जाऊन अधिक पैसे मोजून सी.टी. स्कॅन करावे लागत आसल्यामुळे गरजू गरीब रुग्णांची हेळसांड होत आहे व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे याकडे शासनाने गांभीर्यने लक्ष देवुन
रुग्णालय सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज ठेवण्यासाठी शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करत मागणी केली.
यावर शासनाच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ उत्तर देताना म्हणाले महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेमधून दाखल झालेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालय यांच्यासोबत संस्थास्तरावर करण्यात आलेल्या सामंजस्य करारामधून (MOU) मोफत सीटी स्कॅन केले जातात व इतर रुग्णांना अल्प दरात सी.टी. स्कॅन केले जातात.तसेच लवकरात लवकर मशीन दुरुस्त करुन कार्यान्वित केली जाईल असे सांगण्यात आले.