गुळवे हॉस्पिटल व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने हाडांची मोफत तपासणी संपन्न

गुळवे हॉस्पिटल व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने
हाडांची मोफत तपासणी संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 24/7/2023 : संग्रामनगर-अकलूज येथील गुळवे हॉस्पिटल आणि रोटरी क्लब सराटी डिलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने हाडांची खनिज घनता मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले. यामध्ये 102 नागरिकांच्या हाडांची तपासणी करण्यात आली. डॉक्टर रावसाहेब गुळवे, गौरव वर्मा, मानाजी गंगनमले, लखन बेंद्रे, यांनी लाभार्थींची तपासणी करून हाडांच्या
विविध दुखण्यांबाबत सल्ला, उपचार व मार्गदर्शन केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल जाधव, सेक्रेटरी विलास शिंदे, जगदीश कदम, नितीन दोशी, संयुक्ता दोशी, स्वाती चंकेश्वरा, मृणाल दोशी, मनीषा गुळवे, मेघा जामदार, डॉक्टर मनीषा गांधी, दैनिक लोकमतचे पत्रकार राजीव शरद लोहकरे, दैनिक सकाळचे पत्रकार शशिकांत महादेव कडबाने, अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता,व aklujvaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यांच्यासह गुळवे हॉस्पिटलचा सर्व स्टाफ क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.