जुन्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची अनुदानाची मागणी योग्यच : आ. डॉ. विनय कोरे

जुन्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची अनुदानाची मागणी योग्यच : आ. डॉ. विनय कोरे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) / दिनांक 25/7/2023 : ” राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती होणार आहे. हे शिक्षक तयार करण्याचे कार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालये करत असतात. सन 2001 नंतर कायम विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षणशास्त्र महाविद्यालये सुरू झाली. त्यापूर्वी ची शिक्षणशास्त्र महाविद्यालये अनुदानासाठी पात्र असून संघटनेची 100 टक्के अनुदान मिळण्याची मागणी योग्यच आहे, ” असे मत आमदार डॉ. विनय कोरे यांनी रविवारी वारणानगर येथे संघटनेच्या शिष्टमंडळा शी बोलताना व्यक्त केले.
विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालय संघटनेच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. मेघा गुळवणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आ. कोरे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील, गडहिंग्लज येथील जागृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर शिंदे, प्रा. आर. बी. पाटील, कोल्हापूर येथील खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया खांडके, पेठवडगाव येथील सावित्रीबाई फुले महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या दयावती चव्हाण, पेठवडगाव च्या माने शिक्षणशास्त्र महाविद्यालया चे रणजित चव्हाण आदींचा समावेश होता.
सन 2001 पूर्वीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची अनुदानासाठी सन 2014 पासून आत्तापर्यंत शासनाने दोनदा तपासणी करूनही अनुदान देण्यात दुर्लक्ष केल्याची खंत शिष्टमंडळाने व्यक्त केली. याशिवाय संघटनेच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या पाच महिन्यांपासून संघटनेचे आंदोलन सुरू असून त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे डॉ. मेघा गुळवणी यांनी स्पष्ट केले.
संघटनेच्या शिष्टमंडळा ला आश्वासित करताना आ. कोरे म्हणाले, ” सुरू असलेल्या अधिवेशनात लक्षवेधी मांडून आपणास न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. याशिवाय संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची भेट घडवून आणण्यासाठी मी पुढाकार घेईन. येत्या आठवड्यात आपला अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन “.