आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

शरद पवार महाराष्ट्राला मुर्ख समजतात काय ?

शरद पवार महाराष्ट्राला मुर्ख समजतात काय ?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 21/7/2023 :
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांच्या एकंदरीत वागण्याचा मुत्सद्दीपणाचा व ते राजकारणात चाणाक्ष म्हणून ओळखले जातात त्यांची बेरकी चाल ही भल्या भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकणारी आहे म्हणजे त्यांचं असं झालं की आपला तो बाब्या आणि दुसर्याच् कार्ट
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे अजित पवार यांनी त्यांचे समर्थक आमदार यांना घेऊन सत्तारुढ भाजप शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी झाले आहेत नऊ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे राजकीय शिमगोत्सव सुरू असताना काल मुंबईत यशवंतराव चव्हाण संकुलात त्या नऊ मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेण पवारांनी प्रतिक्रिया न देणं व आज पुन्हा अजित पवार यांच्या कडे गेलेल्या बत्तीस आमदारांनी अजित पवारांसह शरद पवार यांना भेटायला जाणे त्यांनी पवारांची मनधरणी करण त्यात पवारांचे मौन धारण हे सर्व पाहिल्यावर राजकारण कोणत्या थराला चाललें आहे व सुसंस्कृत विचारधारा धुळीस मिळून सभ्यतेचा साधनशुचितेची चौकट मोडून पडली आहे हे लक्षात येते पवारांकडे मनधरणी करिता आलेल्या मंत्री आमदार यांना पवारांनी खडसावले का नाही विनंती का ऐकुन घेतली मुळात त्यांनी त्यांना भेटुच कसे दिलं दुसरे असे की आज पावसाळी अधिवेशन सुरू आहे विरोधक विधानसभा पायरीवरून सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार तेथे उपस्थित नव्हते दुपारी विधानसभेत अजित पवार बोलत असताना कांग्रेस उबाठा गटाचे आमदार घोषणाबाजी करत असताना शरद पवार गटाचे आमदार शांत होते याचा अर्थ नेमका काय घ्यायचा एकंदरीत यातून एकच सोयीचा व शरद पवार यांच्या सुपीक डोक्यातून निघालेला निर्णय म्हणजे तुम्ही भाजप बरोबर गेलात ते योग्यच झाले आम्ही उध्दव ठाकरे व कांग्रेस व महाविकास आघाडीतील इतर घटकांचा हळुहळू बंदोबस्त व संपवून भाजपच्याच बरोबर येत आहोत “शरद पवारांच्या नादाला कोणी लागायचं नाही ते जे करतात बोलतात ते त्या प्रमाणे वागत नाहीत बोलत नाहीत म्हणजे ते महाराष्ट्राला मुर्ख समजतात काय असा सवाल विचारला तर नवल वाटायला नको”

पत्रकार बी. टी. शिवशरण
श्रीपूर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.