आपला जिल्हाऐतहासिकधार्मिकसामाजिक

“संत नामदेव महाराजांनी सकल मानव जातीला शांती, समता व बंधुत्वाची शिकवण दिली” – धैर्यशिल मोहिते-पाटील

“संत नामदेव महाराजांनी सकल मानव जातीला शांती, समता व बंधुत्वाची शिकवण दिली” – धैर्यशिल मोहिते-पाटील

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

(गजानन जवंजाळ यांज कडून)

अकलूज  दिनांक 15/7/2023 : “मोगलाई काळात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करुन वारकरी सांप्रदयाबरोबरच सकल मानव जातीला शांती, समता व बंधूताची शिकवण देणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे वर्षभरात सुंदर व भव्यदिव्य मंदिर उभे करु” अशी ग्वाही भाजपचे जिल्हा संघटन सचिव धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील यांनी दिली.दि.१५ जुलै रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ वा संजीवन समाधी सोहळ्याचे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज युवक संघटना अकलूज, संत नामदेव प्रतिष्ठान अकलूज व संत नामदेव महाराज महिला मंडळ अकलूज तसेच भावसार शिंपी समाज यांचे वतीने श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर अकलूज येथे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी, गोपाळकृष्ण आणि संत नामदेव महाराज यांच्या मुर्तीची महापुजा .मकरंद जामदार आणि सौ.सरोज जामदार या उभयंतांच्या हस्ते करण्यात आली. व नंतर अकलूज शहरातून सवाद्य नामगजरात, भजन, अभंगवाणीच्या जयघोषात संत नामदेवांच्या प्रतिमेची आणि संतांच्या ग्रंथांची सुशोभित केलेल्या पालखी रथातून भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी लहान मुला-मुलींनी पेहराव केलेल्या विठ्ठल रुक्मिणी तसेच संतांच्या वेषभुषांनी व हाती घेतलेल्या भगव्या झेंड्यांनी तसेच समाज बांधवांनी पांढरा पायजमा-कुर्ता तर भगिनींनी पोपटी रंगाची साडी असा पेहराव केल्याने मिरवणूकीस उत्तम शोभा आली. तसेच बंधु भगिनींनी मिरवणूकीत पाऊले आणि फुगड्या या खेळाचा मनसोक्त आनंद लुटला.

यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नामदेव गाथाव्रती ह.भ.प.प्रकाश निकते गुरुजी (पंढरपूर) यांचे सुश्राव्य निरुपण झाले. या निरुपणातून त्यांनी संत नामदेवांचे जीवन चरित्र तसेच नामदेव गाथा चे सार सांगताना “संत नामदेव महाराज” हे पांडुरंगाचे प्रेमभांडारी संत, लडिवाळ भक्त होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना “भक्त शिरोमणी” ही पदवी प्रथम बहाल केली. त्यांना भक्ती सुखाचा अनुभव घेण्यासाठी तीर्थयात्रेला नेले असे सांगत “नामदेवांची गाथा” विषयी बोलताना ते म्हणाले, “नामदेवांची गाथा ही प्रेम भक्ती सुखाचा अनुभव देणारी पीयुषवाणी आहे, सात्विक समाधान देणारी गाथा आहे, भक्ती ज्ञान वैराग्य यांचा त्रिवेणी संगम असून देव आणि भक्त यांचे अतुट नाते नामदेव गाथे मध्ये पहावयास मिळते. नामदेवांच्या अभंगां विषयी सांगताना ते म्हणाले की, “नामयाची अभंगवाणी, असे अंमृताची खाणी. जीवनाचे सोने करी, एक तरी ओवी अनुभवावी. अशी नामदेव गाथेची महती आहे व नामदेव गाथा, भगवतगीता पासून ते सर्व संतांचे ग्रंथ, गाथा, संत साहित्य सर्वांनी अभ्यासले आणि आपल्या भावी पिढीला ते समजावले व अंगिकारले तर सदवर्तन, सद्विचार, सद्विवेक यामुळे जीवन सुखकर व आनंदी होईल असे त्यांनी सांगितले.

तद्नंतर दु.१२ वा. महाआरती, गुलाल आणि पुष्पवृष्टीचा कार्यक्रम भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, ह.भ.प.एकतपुरे महाराज, पंचायत समिती सदस्या सौ.हेमलता चांडोले, सौ.प्रतिभाताई निकते या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या समाधी सोहळयाचे औचित्य साधून दि.७ जुलै पासून नामदेव गाथेचे पारायण सुरु होवून १४ जुलै रोजी पारायणाची सांगता नामगजरात व भक्तीमय वातावरणात झाली. दि. ९ जुलै रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपुर-पुणे यांचावतीने नामदेव चरित्र, नामदेव गाथा याचे देशभरातील पारायण, किर्तन, प्रवचन माध्यमातून प्रसार व प्रचार यातील नामदेवगाथा व्रती निरुपणकार ह.भ.प.प्रकाश निकते गुरुजी यांचे योगदान विचारात घेवून त्यांना “जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार” ने नुकतेच सन्मातीत करण्यात आले त्याबद्दल त्यांचा व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रतिभाताई यांचा समस्त भावसार शिंपी समाजाच्यावतीने धैर्यशिल मोहिते पाटील यांचे शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
महाप्रसादाचा भाविकांना लाभ डॉ.श्रीनिवास जामदार आणि जामदार परिवार यांचे वतीने देण्यात आला. याबद्दल मकरंद जामदार यांचा तसेच या सोहळा निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे आतील सजावट संत नामदेव महाराज प्रतिष्ठान अकलूज वतीने करण्यात आल्याबद्दल गणेश सटाले आणि अनिकेत गोंदकर यांचा, या उत्सवासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल पांडुरंग उर्फ दादा मुळे यांचा, सकाळी चहा आणि नाष्टाची सोय दादा मुळे आणि सचिन जवंजाळ यांनी केल्याबद्दल त्यांचा सन्मान व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पुढील २०२३-२४ सालचे कार्यकारीणी जाहिर करण्यात आली व या कार्यकारिणीतील श्री.संत नामदेव युवक मंडळाचे नुतन अध्यक्ष प्रा.कल्याण मुळे , उपाध्यक्ष राजू ढेरे यांचा तसेच महिला कार्यकारिणी नुतन अध्यक्षा सौ.वैशाली पोरे, उपाध्यक्षा सौ.सारिका बारटक्के यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी पंढरपूर ते घुमान या २५०० कि.मी. सायकल यात्रेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे व शैक्षणिक तथा इतर कार्य क्षेत्रात उल्लेखनिय यश प्राप्त केलेले शिंपी समाजातील हर्ष ढवळे, यज्ञेश जबडे, पार्थ मिरजकर, गौरांग जामदार, सिध्दी जामदार, राधिका जामदार, शताक्षी जबडे, हरिओम महिंद्रकर, सानिका जवंजाळ, प्रा.कल्याण मुळे सर, रोहन जवंजाळ यांचा सन्मान तसेच पारितोषिंकासाठी प्रायोजकत्व दिलेले गजानन जवंजाळ, मनोज रेळेकर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपिठावर सोलापूर जिल्हा परिषद सदस्य व भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील, ह.भ.प. प्रकाश निकते गुरुजी, ह.भ.प.एकतपुरे महाराज, माळशिरस पंचायत समिती सदस्या सौ.हेमलता चांडोले हे मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी ‘भगवत् गीतेतील’ श्लोक म्हणून सौ.राणी कंधारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजीवन समाधी सोहळा यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी संत नामदेव युवक मंडळ, महिला मंडळ, संत नामदेव महाराज ट्रस्ट आणि नामदेव प्रतिष्ठान, अकलूज यामधील सर्व सदस्य तसेच नामदेव-भावसार शिंपी समाजातील सर्व जेष्ठ, युवा, महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दि.१५ जुलै रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ वा संजीवन समाधी सोहळ्याचे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज युवक संघटना अकलूज, संत नामदेव प्रतिष्ठान अकलूज व संत नामदेव महाराज महिला मंडळ अकलूज तसेच भावसार शिंपी समाज यांचे वतीने श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर अकलूज येथे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी, गोपाळकृष्ण आणि संत नामदेव महाराज यांच्या मुर्तीची महापुजा .मकरंद जामदार आणि सौ.सरोज जामदार या उभयंतांच्या हस्ते करण्यात आली. व नंतर अकलूज शहरातून सवाद्य नामगजरात, भजन, अभंगवाणीच्या जयघोषात संत नामदेवांच्या प्रतिमेची आणि संतांच्या ग्रंथांची सुशोभित केलेल्या पालखी रथातून भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी लहान मुला-मुलींनी पेहराव केलेल्या विठ्ठल रुक्मिणी तसेच संतांच्या वेषभुषांनी व हाती घेतलेल्या भगव्या झेंड्यांनी तसेच समाज बांधवांनी पांढरा पायजमा-कुर्ता तर भगिनींनी पोपटी रंगाची साडी असा पेहराव केल्याने मिरवणूकीस उत्तम शोभा आली. तसेच बंधु भगिनींनी मिरवणूकीत पाऊले आणि फुगड्या या खेळाचा मनसोक्त आनंद लुटला.
यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नामदेव गाथाव्रती ह.भ.प.प्रकाश निकते गुरुजी (पंढरपूर) यांचे सुश्राव्य निरुपण झाले. या निरुपणातून त्यांनी संत नामदेवांचे जीवन चरित्र तसेच नामदेव गाथा चे सार सांगताना “संत नामदेव महाराज” हे पांडुरंगाचे प्रेमभांडारी संत, लडिवाळ भक्त होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना “भक्त शिरोमणी” ही पदवी प्रथम बहाल केली. त्यांना भक्ती सुखाचा अनुभव घेण्यासाठी तीर्थयात्रेला नेले असे सांगत “नामदेवांची गाथा” विषयी बोलताना ते म्हणाले, “नामदेवांची गाथा ही प्रेम भक्ती सुखाचा अनुभव देणारी पीयुषवाणी आहे, सात्विक समाधान देणारी गाथा आहे, भक्ती ज्ञान वैराग्य यांचा त्रिवेणी संगम असून देव आणि भक्त यांचे अतुट नाते नामदेव गाथे मध्ये पहावयास मिळते. नामदेवांच्या अभंगां विषयी सांगताना ते म्हणाले की, “नामयाची अभंगवाणी, असे अंमृताची खाणी. जीवनाचे सोने करी, एक तरी ओवी अनुभवावी. अशी नामदेव गाथेची महती आहे व नामदेव गाथा, भगवतगीता पासून ते सर्व संतांचे ग्रंथ, गाथा, संत साहित्य सर्वांनी अभ्यासले आणि आपल्या भावी पिढीला ते समजावले व अंगिकारले तर सदवर्तन, सद्विचार, सद्विवेक यामुळे जीवन सुखकर व आनंदी होईल असे त्यांनी सांगितले.
तद्नंतर दु.१२ वा. महाआरती, गुलाल आणि पुष्पवृष्टीचा कार्यक्रम भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, ह.भ.प.एकतपुरे महाराज, पंचायत समिती सदस्या सौ.हेमलता चांडोले, सौ.प्रतिभाताई निकते या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या समाधी सोहळयाचे औचित्य साधून दि.७ जुलै पासून नामदेव गाथेचे पारायण सुरु होवून १४ जुलै रोजी पारायणाची सांगता नामगजरात व भक्तीमय वातावरणात झाली. दि. ९ जुलै रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपुर-पुणे यांचावतीने नामदेव चरित्र, नामदेव गाथा याचे देशभरातील पारायण, किर्तन, प्रवचन माध्यमातून प्रसार व प्रचार यातील नामदेवगाथा व्रती निरुपणकार ह.भ.प.प्रकाश निकते गुरुजी यांचे योगदान विचारात घेवून त्यांना “जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार” ने नुकतेच सन्मातीत करण्यात आले त्याबद्दल त्यांचा व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रतिभाताई यांचा समस्त भावसार शिंपी समाजाच्यावतीने धैर्यशिल मोहिते पाटील यांचे शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
महाप्रसादाचा भाविकांना लाभ डॉ.श्रीनिवास जामदार आणि जामदार परिवार यांचे वतीने देण्यात आला. याबद्दल मकरंद जामदार यांचा तसेच या सोहळा निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे आतील सजावट संत नामदेव महाराज प्रतिष्ठान अकलूज वतीने करण्यात आल्याबद्दल गणेश सटाले आणि अनिकेत गोंदकर यांचा, या उत्सवासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल पांडुरंग उर्फ दादा मुळे यांचा, सकाळी चहा आणि नाष्टाची सोय दादा मुळे आणि सचिन जवंजाळ यांनी केल्याबद्दल त्यांचा सन्मान व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पुढील २०२३-२४ सालचे कार्यकारीणी जाहिर करण्यात आली व या कार्यकारिणीतील श्री.संत नामदेव युवक मंडळाचे नुतन अध्यक्ष प्रा.कल्याण मुळे , उपाध्यक्ष राजू ढेरे यांचा तसेच महिला कार्यकारिणी नुतन अध्यक्षा सौ.वैशाली पोरे, उपाध्यक्षा सौ.सारिका बारटक्के यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी पंढरपूर ते घुमान या २५०० कि.मी. सायकल यात्रेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे व शैक्षणिक तथा इतर कार्य क्षेत्रात उल्लेखनिय यश प्राप्त केलेले शिंपी समाजातील हर्ष ढवळे, यज्ञेश जबडे, पार्थ मिरजकर, गौरांग जामदार, सिध्दी जामदार, राधिका जामदार, शताक्षी जबडे, हरिओम महिंद्रकर, सानिका जवंजाळ, प्रा.कल्याण मुळे सर, रोहन जवंजाळ यांचा सन्मान तसेच पारितोषिंकासाठी प्रायोजकत्व दिलेले गजानन जवंजाळ, मनोज रेळेकर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपिठावर सोलापूर जिल्हा परिषद सदस्य व भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील, ह.भ.प. प्रकाश निकते गुरुजी, ह.भ.प.एकतपुरे महाराज, माळशिरस पंचायत समिती सदस्या सौ.हेमलता चांडोले हे मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी ‘भगवत् गीतेतील’ श्लोक म्हणून सौ.राणी कंधारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजीवन समाधी सोहळा यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी संत नामदेव युवक मंडळ, महिला मंडळ, संत नामदेव महाराज ट्रस्ट आणि नामदेव प्रतिष्ठान, अकलूज यामधील सर्व सदस्य तसेच नामदेव-भावसार शिंपी समाजातील सर्व जेष्ठ, युवा, महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.