आपला जिल्हासहवेदना

सोलापूर जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे माजी चेअरमन वासुदेव नरहर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

सोलापूर जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे माजी चेअरमन
वासुदेव नरहर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 19/7/2023 : माळशिरस तालुक्यातील तांबवे येथील अत्यंत शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले, सोलापूर जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे माजी चेअरमन वासुदेव नरहर कुलकर्णी ( वय 75 वर्षे) यांचे रविवार दिनांक 16/7/2023 रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, 2 मुले (प्रदिप आणि ॲड.प्रमोद), 1 मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार आहे. कै.वासुदेव नरहर कुलकर्णी यांचे आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कै.वासुदेव नरहर कुलकर्णी हे सोलापूर जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे तीन वर्षे चेअरमन होते. सुमारे पंधरा वर्षे माळशिरस तालूका पतसंस्थेच्या चेअरमनपदी यशस्वीपणे कामकाज केलेले होते . तसेच जवळ जवळ तीस वर्षे विझोरी विकास सोसायटीत सचिव म्हणून कामकाज पाहिले.
त्यांचा दशक्रीया विधी मंगळवार दि.25/07/2023 रोजी सकाळी 08:00 वाजता, अकलूज येथील अकलाई मंदिर घाट येथे होणार आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.