सोलापूर जिल्हा भाजपाचा आश्वासक चेहरा धैर्यशिल मोहिते -पाटील

सोलापूर जिल्हा भाजपाचा आश्वासक चेहरा धैर्यशिल मोहिते -पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 11/7/2023 :
अल्पावधित भाजपा व संघ परिवाराच्या विचारांशी समरस झालेलं नेतृत्व,भारतीय जनता पार्टीचे संघटन महासचिव (सोलापूर जिल्हा ),जिल्हा नियोजन समिती, सदस्य, धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील
फक्त राजकारण करणारे खुप असतात. पण नाण्याची दुसरी बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे. असेही राजकारणी असतात जे कसलीही जाहिरातबाजी न करता 24/7 जनतेसाठी उपलब्ध असतात व लोकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देतात. अशा नेत्यांच्या यादीत धैर्यशील मोहिते -पाटील यांचं नाव अग्रस्थानी घ्याव लागेल.
धैर्यशिल मोहिते -पाटील, हे नाव सोलापूर जिल्ह्यातील जनतेला नवीन नाही. सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते -पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील यांचा राजकीय व वैचारिक वारसा त्यांना लाभलाय. हा वारसा जनकल्याणासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी अखंडित पुढे नेण्याचे काम मोठे बंधु आमदार रणजितसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशिल चोखपणे करत आहेत, याबद्दल कोणाचंही दुमत नाही.
धैर्यशिल मोहिते, हे अत्यंत कमी काळात भारतीय जनता पार्टी व संघ परिवाराच्या विचारधारेशी समरस झालेलं नेतृत्व आहे. भाजपा संघटनवाढीसाठी जेवढं कष्ट हा माणूस घेतोय , तेवढं कष्ट घेणारा माणूस आज संपूर्ण जिल्हा भाजपात नाही. बूथ रचना करणे, शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठका घेणे या गोष्टींना भाजपात अनन्यसाधारण महत्व आहे. हे सर्व काम फक्त माळशिरसच नाही तर माढा करमाळा, बार्शी या शेजारील तालुक्यात सुद्धा योग्य रीतीने झाले पाहिजे यासाठी स्वतः सर्व कार्यकर्त्याशी, बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख यांच्याशी संपर्कात राहून करण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. तालुक्यात व जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचे योग्य संयोजन करून पक्षाला मोठं यश त्यांनी मिळवून दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात येण्यासाठी, भारत महासत्ता बनण्यासाठी, भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा कार्यकर्ता समाजाच्या सर्व स्तरात निर्माण झाला पाहिजे, सोलापूर जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला झाला पाहिजे, यासाठी धैर्यशिल यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढलाय. त्यांच्याकडे अंगभूत असलेल्या संघटनकौशल्यामुळे, पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळली आहे. जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्याशी ते प्रत्यक्ष संपर्कात आहेत. विशेष म्हणजे भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना सुद्धा योग्य तो सन्मान देण्यासाठी ते आग्रही असतात. त्यामुळे जुन्या – नव्या सर्वच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये ‘धैर्यशिल मोहिते-पाटील, म्हणजे आपला हक्काचा माणूस अशी भावना आहे.
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ, शिवरत्न नॉलेज सिटी अशा विविध संस्थाच्या माध्यमातूनही ते समाजासाठी आपले मोठे योगदान देत आहेत, पण ‘ताराराणी महिला कुस्ती केंद्र ‘ हा त्यांच्या सामाजिक कार्यातील परमोच्च बिंदू ठरतो. मुलींसाठी स्वतंत्र , अत्याधुनिक असं कुस्ती केंद्र उभारणं, तेही अकलूजसारख्या ग्रामीण भागात; ही कल्पनाच युनिक अशी आहे. मे महिन्यात, ‘ महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धे’चं आयोजन ‘ताराराणी महिला कुस्ती केंद्र ‘करतंय.
धैर्यशिल हे जनतेप्रती किती संवेदनशील आहेत, याचं मोठं उदाहरणं म्हणजे – त्यांनी ‘डोपिंग ‘ विरोधी उठविलेला आवाज. जिल्ह्यातील कुस्तीपटूमध्ये शरीरासाठी अत्यंत घातक ‘मेफेन टर्माईन इंजेक्शन ‘ घेण्याचा वाईट प्रघात वाढत चाललाय , हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री व स्वतः पंतप्रधान मोदीजींना निवेदन देऊन हे थांबविण्यासाठी प्रयत्न केले.
‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व शेवटी स्वतः ‘
या भाजपाच्या घोषवाक्याप्रमाणे अहोरात्र कष्ट करणाऱ्या या कार्यकर्त्यांला , धैर्यशिल
राजसिंह मोहिते -पाटील यांना पक्षांकडून सुद्धा येणाऱ्या काळात मोठी जबाबदारी दिली जाईल, याबद्दल शंका नाही.
हणमंत जगन्नाथ दुधाळ
मांडवे, तालुका -माळशिरस