कृषी/साखर कारखानाप्रेरकमहाराष्ट्र

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२३-२०२४ करीताचे मील रोलर पूजन संपन्न

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम
२०२३-२०२४ करीताचे मील रोलर पूजन संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 11/7/2023 : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२३ – २०२४ करीता मील रोलरचे पूजन मंगळवार दि. ११/०७/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता कारखान्याच्या संचालिका कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
गळीत हंगाम २०२३-२०२४ चालू करण्याचे दृष्टीने कारखाना व इतर उपपदार्थ प्रकल्पाकडील ओव्हर हॉलिंगची कामे प्रगतीपथावर असून शेती विभागामार्फत ऊस तोडणी वाहतूकीचे वाहन करार करण्याचे कामकाज दि.०६/०४/२०२३ पासून सुरू केले असून ते पुर्नावस्थेत आले आहे.
कारखान्याने येत्या गळीत हंगाम २०२३ – २०२४ मध्ये ११ लाख मे. टन ऊस गाळप करणेचे उद्दीष्ट ठेवणेत आलेले आहे. त्यासाठी सर्व सभासद व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक बिगर सभासद यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याच्या संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेच तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, संचालक- लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, गोविंद पवार, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, संचालिका सुजाता शिंदे व माजी संचालक विजय माने-देशमुख, महादेवराव घाडगे, राजेंद्र मोहिते, चांगदेव घोगरे, भारत फुले, भिमराव काळे, महादेवराव चव्हाण, सुभाष पताळे, केशव ताटे, मोहन लोंढे, पांडूरंग कदम व इतर मान्यवर धनंजय दुपडे, विनायक केचे, अनिलराव कोकाटे, बाळासाहेब माने-देशमुख, पांडूरंग एकतपुरे, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, दत्तात्रय चव्हाण, श्रीकांत बोडके तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, खातेप्रमुख, कामगार व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.