आपला जिल्हाकृषी/साखर कारखाना

दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, मॅनेजिंग डायरेक्टरपदी सतीश गिरमे

दि सासवड माळी शुगर फॅक्टरी,
मॅनेजिंग डायरेक्टरपदी सतीश गिरमे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 10/7/2023 :
माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या नूतन मॅनेजिंग डायरेक्टरपदी कारखान्याचे विद्यमान होलटाईम डायरेक्टर सतीश दिगंबरराव गिरमे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
माळीनगर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मिटिंग शुक्रवार दि.७ जुलै रोजी कारखानास्थळी घेण्यात आली.कारखान्याचे विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर नंदकुमार गिरमे यांचे वय ७० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना कंपनी कायद्याप्रमाणे मॅनेजिंग डायरेक्टर पदावरून पदमुक्त व्हावे लागले. त्यामुळे या रिक्त होणाऱ्या मॅनेजिंग डायरेक्टर पदासाठी सतीश गिरमे यांची निवड करण्यात आली.या मिटिंगच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे हे होते.यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर नंदकुमार गिरमे, व्हा.चेअरमन परेश राऊत, संचालक अशोक गिरमे, गणेश इनामके, मोहन लांडे, राहुल गिरमे, विशाल जाधव, यश बोरावके, निळकंठ भोंगळे, निखिल कुदळे उपस्थित होते.
नूतन मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे हे कारखान्याचे संचालक मंडळात १४ वर्षे काम पहात आहेत.तसेच दि ११ जुलै २०२० पासून ते होलटाईम डायरेक्टर म्हणून यशस्वीरित्या काम पाहत आहेत.दि.९ जुलै २०२३ पासून श्री.गिरमे यांची पुढील २ वर्षासाठी मॅनेजिंग डायरेक्टरपदी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल श्री.गिरमे यांचा कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाने सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, भागधारक, सभासद, शेतकरी, अधिकारी, कामगार व ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून त्याचप्रमाणे व्हाट्सअप मेसेजद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी श्री.गिरमे यांना शुभेच्छा दिल्या.


फोटो ओळी-
माळीनगर साखर कारखान्याचे नूतन मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे यांचे सत्काराप्रसंगी राजेंद्र गिरमे,नंदकुमार गिरमे,परेश राऊत,अशोक गिरमे,गणेश इनामके,मोहन लांडे,राहुल गिरमे,विशाल जाधव,यश बोरावके,निळकंठ भोंगळे,निखिल कुदळे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.