आरोग्य व शिक्षणप्रेरकसामाजिक

आजरा तालुक्यातील १५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आजरा तालुक्यातील १५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

आजरा तालुका प्रतिनिधी दिनांक 08/07/2023 :
एक वही समाज बांधवांसाठी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमांतर्गत गेली नऊ वर्ष सातत्याने धनगर वाड्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल वाढला असून जे विद्यार्थी आपली परिस्थिती गरिबीचे असल्याने शिक्षण अर्धवट सोडून कामावर जात असत हे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षणाच्या प्रभावात येत आहेत ही समाधानाची बाब असून अनेक छोटे छोटे विद्यार्थी- विद्यार्थिनी डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, शिक्षक, आयपीएस होणार अशी इच्छा बोलून दाखवत आहेत हीच खरी समाधानाची बाब आहे. असे मत यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी व्यक्त केले. चितळे धनगरवाडा येथे साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकार रंजीत कालेकर, यशवंत क्रांती संघटनेचे आजरा तालुका अध्यक्ष बयाजी एडगे, यशवंत क्रांतीचे विलास वाकसे हे उपस्थित होते ते बोलताना पुढे म्हणाले गेली नऊ वर्ष हा उपक्रम लोकसहभागातून सातत्याने सुरू आहे दरवर्षी या उपक्रमांतर्गत जसजसे लोकसभागातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल तसतसे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते. आज पर्यंत त्याचा फायदा दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे आणि होत आहे केवळ आपले शिक्षण परिस्थितीमुळे अर्धवट राहत होते ते आता राहत नाही. आपण शिकायला लागलो तर आपणाला नक्की मदत मिळते हे विद्यार्थ्यांना माहीत झाल्याने विद्यार्थी शाळेत यायचे थांबत नाही उलट तिसरी चौथीतील विद्यार्थी सुद्धा आयपीएस इंजिनियर पोलीस शिक्षक डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. ही गोष्ट फार समाधानकारक आहे. या उपक्रमाचा उद्देशच दुर्गम भागातज राहणारा एखादा विद्यार्थी आयपीएस किंवा आयएएस व्हावा हाच उद्देश आहे. आणि तो उद्देश लवकरच सफल होईल हीच समाधानाची बाब आहे. तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याबाबत संजय वाघमोडे यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून कायम एक पाऊल पुढे असतात त्यांना धनगर समाजातील लोकांनी साथ द्यावी असे रणजीत कालेकर यांनी याप्रसंगी म्हटले. यशवंत क्रांतीचे तालुकाध्यक्ष बयाजी ऐडगे बोलताना म्हणाले की आज पर्यंत धनगरवाडे व धनगर वाड्याच्या प्रश्नाबाबत धनगर समाजातील कोणताही नेता आमच्यापर्यंत कधी आला नाही आमच्या अडचणी व्यथा कधी समजून घेतल्याच नाहीत परंतु वाघमोडे मात्र अडचणीच्या काळात फोन केला की ताबडतोब आम्हाला मदत करतात अशीच मदत आम्हाला मिळाली तर धनगरवाडे ही मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. मी नोकरी निमित्त भारतात सर्व ठिकाणी फिरलो मला कधीही वाटले नव्हते की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात धनगर समाज एवढा मागास असेल कारण कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाज अतिशय प्रगत आहे हेच मी समजत होतो परंतु वाघमोडे यांच्या बरोबर धनगर वाड्यावर येण्याचा योग आला आणि आज डोळ्यांसमोर जी परिस्थिती पाहिली मनाला खूप वेदना झाल्या आजही आमच्या समाजापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्याच नाहीत आजही समाज अतिशय पाठीमागे राहिला आहे मग आमच्या नेत्यांनी आजपर्यंत केले काय ? धनगरवाडे व मेंढपाळ यांच्यासाठी यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून जो लढा सुरू केला आहे यासाठी आपण सर्वजण मिळून त्यांना पाठबळ देऊया आणि धनगरवाडे व मेंढपाळ यांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया असे विलास वाकसे म्हणाले. यावेळी मुख्याध्यापक अध्यापक विद्यार्थी व पालक उपस्थित होते या उपक्रमाच्या माध्यमातून चितळे धनगरवाडा, मराठी विद्यामंदीर चितळे,मोरेवाडी धनगरवाडा विद्या मंदिर मोरेवाडी येथील दीडशे विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणी जाऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.