देश विदेशधार्मिकप्रेरकसामाजिक

काल उपवास केला. आज पारण फेडा!

  •  काल उपवास केला.
    आज पारण फेडा!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 30/6/2023 :

एकादशीच्या दिवशी!
नाम राहिले उपाशी!!
द्वादशीच्या दिवशी!
नाम बैसले स्वयंपाकी!!
देव श्वान रूपी आला!
पोळ्या घेऊनी पळालां!!
उभा उभा श्वान रुपी!
तूप माखू दे पोळ्याशी! कोरड्या पोळ्या कैसा खाशी!!
वरील प्रसंग हां संत नामदेवांच्या आयुष्यातील आहे. काही मंडळींनी या प्रसंगाची टिंगल केली होती. पण पांडुरंगाची कमाल बघा, या टिंगलखोर लोकांनाच पांडुरंगानी वारकऱ्यांच्या पोळ्या भाजायला लावून त्यावर तूप माखायला लावल. हां माझ्या विठ्ठलांचा न्याय आहे.
राम कृष्ण हरी!


वारकारी पंथात संत नामदेवांचं खूप मोठं स्थान आहे. भारत देशात अस्पृश्यता निवांरण करण्याची पहिली सुरवात नामदेवानी केली. संत चोखोबाचे ते गुरु होते. महार जातीतील व्यक्तीला पहिला अनुग्रह देऊन त्यांना वारकरी करणारे नामदेव महाराज पहिले आहेत. संत जनाबाई या अनाथ अस्पृश्य मुलीला दत्तक घेऊन स्वतःच्या घरात कुटुंबाची एक सदस्य तिला केली. आणि हे सातसे वर्षा पूर्वी घडले हे विशेष आहे. हाच धागा पुढे नेते अनेक संतानी अस्पृश्यता टाळा अशी शिकवण दिली. पण ती रूढी एवढी घट्ट होती कीं, अजूनही सुटता सुटत नाही. संत एकनाथांनी उन्हात पाय भाजत असलेल्या महाराच्या मुलाला उचलून कडेवर घेतलं. संत तुकाराम महाराज म्हणतात, भेदाभेद अमंगळ.
तर संपूर्ण देशात अस्पृश्यता निवारण्याच काम संत नामदेव महाराज यांनी सुरु केले. संत कबीर, संत रविदास हे सर्वं नामदेव-चोखोबा यांच्या नंतरच्या काळातील आहेत.
चोखोबाच गाव मंगळवेढा. या गावात गावाची वेश बांधायच काम चोखोबा करत होते. ती भिंत अंगावर कोसळून चोखोबा गतप्राण झाले. त्यावेळी नामदेव महाराज उत्तर भारतात होते. ते महाराष्ट्रात आल्यावर त्यांना चोखोबा बद्दल कळले. ते तडक मंगळवेढ्यालां गेले. तिथे त्यांनी चोखोबाची हाडे एकत्र जमा केली. याबद्दल अशी आख्याईका आहे कीं, ते एक एक हाड कानाला लावून बघायचे. ज्यातून विठ्ठल विठ्ठल नाम ऐकू यायचे ते हाड चोखोबांचे आहे असं परीक्षण करून त्यांनी ती हाडे पंढरपूरलां आणली. ती पंढरपूरात विठ्ठल द्वारा समोर पुरून त्यावर समाधी बांधली. केवढे मोठे काम आहे हे. वारकऱ्यात अस्पृश्यच नव्हे तर वेशेला सुद्धा मोक्षाचा अधिकार देतो. चोखोबानी कान्हो पात्रा या गणिकेला अनुग्रह दिला. एवढी समतेची चळवळ आहे ही वारकारी.
नामदेवानी महाराष्ट्रातचं नव्हे तर उत्तर भारतात धर्म प्रचाराचे कार्य केले. इस्लामी आक्रमका पुढे देश हतबल होता. तिथे जाऊन नामदेवाने समाज संघटित करून त्यांना भक्ती मार्ग दिला. त्यासाठी आधी तिथली भाषा ते शिकले आणि ब्रज, खडी, पंजाबी भाषेत त्यांनी अभंग रचना केल्या. त्यांच्या रचना गुरुग्रंथ साहेबात घेतल्या आहेत. पंजाब राज्यातील घुमान शहरात त्यांचं वास्तव्य होतं. तिथं शीख बांधवानी नामदेव गुरुद्वारा बांधला आहे. त्यांचा असा दावा आहे कीं, या गुरुद्वारात नामदेव महाराज यांची समाधी आहे. आपण असं मानतो कीं, नामदेव महाराज यांची समाधी पंढरपूरात विठ्ठलाच्या पहिल्या पायरी वर आहे. तिथे आता आपण मंदिरही उभ केलं आहे. खरी समाधी कोणतीही असो पण नामदेवांचं काम खरं आहे. ते भारतभर आहे.
आळंदीत माऊली ज्ञानदेवानी समाधी घेतली तेव्हा त्यांना समाधी स्थळी घेऊन जाणारे दोघे म्हणजे एक पांडुरंग श्रीकृष्ण आणि दुसरे नामदेव होते. देव आणि नामदेव यांनी एक एक हात हातात घेऊन ज्ञानेश्वर माउलींना समाधी स्थळी नेले. एवढा मोठा अधिकार नामदेवांचा आहे. देवाच्या एवढा अधिकार नामदेव यांचा आहेे.

हल्ली व्हाट्स अँप वर हिंदुधर्म विरुद्ध अनेक निनावी पोस्ट फिरतात. त्यात हिंदू धर्मा बद्दल केवळ टिंगल टवाळीचं नव्हे तर येथेच्छ शिवीगाळ केलेली असतें. ग्रुप वरील हिंदू ती निमूट पणे सहन करतात. काही तर मजाही घेतात. अशा पोस्ट तयार करणारे जास्त हिंदूच असतात. त्यांना बाहेरील देशातून फंड पुरविला जातो. त्यातील एक पोस्ट अशी आहे. दगड देव, झाड देव, बैल देव, कुत्रा देव वगैरे.
सनातन हिंदू धर्म वारकारी पंथ आणि एकूण सर्वच भारतीय धर्म अद्वैत मानतात. म्हणजे प्रत्येक सजीवात ईश्वर आहे असं मानतात. हां ईश्वरी अंश सजीवात आहे तो आत्मा आहे. ईश्वराच रूप परमात्मा आहे. सजीव मेल्यावर आत्मा शरीर सोडतो आणि तो परमात्म्यात विलीन होतो. हे आत्मा आणि परमात्म्याच मिलन म्हणजे मोक्ष. आत्मा आणि परमात्मा एक असणं म्हणजे अद्वैत. म्हणून सनातनी असं मानतात कीं, कण कण मे भगवान. हर कंकरमे शंकर. देव जळी स्थळी काष्टी पाषाणी भरून उरला आहे.
म्हणून तर चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वं वारकारी एकमेकांच्या पाया पडतात. प्रत्येकात जो ईश्वरी अंश आहे त्याला ते नमस्कार करतात. याच तत्वा नुसार कुत्रा आणि माणूस यांचा आत्मा एकाच ईश्वराचा अंश आहे असं समजून तर पोळ्या घेऊन पळून जाणाऱ्या कुत्र्याच्या मागे नामदेव तुपाची वाटी घेऊन पळाले. नंतर पारण फेडलं. तुम्ही आज पारण फेडा!
रामकृष्ण हरी!


बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.