आरोग्य व शिक्षणप्रेरकमहाराष्ट्रसामाजिक

आर्थिक परिस्थिती हलाखीचे असल्यानेच अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते संजय वाघमोडे

आर्थिक परिस्थिती हलाखीचे असल्यानेच अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते
संजय वाघमोडे
एक वही समाजबांधवासाठी उपक्रमांतर्गत 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Akluj Vaibhav New Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

शाहुवाडी : केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यानेच दऱ्याखोऱ्यात धनगर वाड्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत लागत आहे. असे यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी सांगितले ते शाहूवाडी तालुक्यातील कोतोली धनगरवाडा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते यावेळी सुभाष कांबळे, तानाजी वाघमोडे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले धनगर समाज हा 50 टक्के सह्याद्रीच्या कुशीत दुर्गम अशा धनगर वाड्यावर राहतो. डोंगरांमध्ये राहणाऱ्या समाज बांधवांच्याकडे उत्पन्नाचे साधन नसल्याने जंगलातील रानमेवा विकून कसातरी आपल्या संसाराचा गाडा चालवत असतो सकाळी जेवल्यानंतर संध्याकाळी जेवण मिळेल का नाही याची शाश्वती नसणाऱ्या समाज बांधवांच्या कडे शिक्षणासाठी पैसे कुठून येणार..? उलट शाळेतून काढून मुलींना धुणे भांडी व मुलांना हॉटेलमध्ये किंवा मुंबईत घर कामाला ठेवून आपल्या प्रपंचाला हातभार कसा लागेल यासाठी प्रयत्न करत प्रयत्न करताना दिसतात असे होऊ नये म्हणून एक वही समाज बांधवांसाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाला दानशूर व्यक्ती हातभार लावून राजमाता अहिल्यादेवींची खंडित झालेली दानशूरतेची परंपरा जपत आहेत.
यावेळी सुभाष कांबळे म्हणाले संजय वाघमोडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या एक वही समाजबांधवासाठी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमाचा शाहूवाडी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना फायदा होऊन अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

आज दिवसभरात आळतूर, कोतोली, पुसाळे, धोपेश्वर, खेळता, धनगरवाडा या शाहुवाडी तालुक्यातील 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करा परंतु अनावश्य खर्चाला फाटा देऊन या उपक्रमाला शैक्षणिक साहित्य देऊन मदत करा असे आव्हान करण्यात येते या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोक सहभागातून जमा झालेले साहित्य दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना देण्यात येते यावर्षी या उपक्रमाची सुरुवात 31 मे दिवशी अहिल्यादेवी जयंती दिवशी शैक्षणिक साहित्य वाटून राधानगरी तालुक्यातील बसुदेव धनगर वाडा येथुन करण्यात आली. पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी जयश्री जाधव, यशवंत क्रांती संघटनेचे शाहुवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक अध्यापक यांचेही सहकार्य मिळाले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button