रत्नत्रय मध्ये फळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम

रत्नत्रय मध्ये फळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/7/2025 : माळशिरस तालुक्यातील मांडवे(जि. सोलापूर) येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात फळ वाटपाचा सुत्य उपक्रम प्रत्येक शनिवारी राबविला जातो. लहान मुलांना लहानपणापासूनच फळे खाण्याची सवय लागावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम शाळेमध्ये घेण्यात येतो. नियमित फळांचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते, त्याचबरोबर लहान मुलांमध्ये फळे खाण्याची आवड निर्माण होते तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम घेतला जातो त्यानिमित्त पालकांना निमंत्रित केले जाते. मुलांचे स्टेज डेईरिंग वाढते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांना आपल्या पाल्याच्या गुणवत्तेची कल्पना येते.
या कार्यक्रमासाठी पालक डॉ. सौ. सनोवर मुलाणी, विजय टेळे, विजय गोरे, विजय वाघमोडे तसेच प्रशालेचे उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, परीक्षा विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. विशाखा साळुंखे यांनी केले. या शनिवारचे फळ वाटप दातार निश्चल व्होरा अकलूज (संचालक रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर) यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.
🍓🍓🍏🍊🍒🥭🥭🍈🍐