सोलापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तालुका संघटक सहसचिवपदी सुजाता गाडगीळ यांची निवड

सोलापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तालुका संघटक सहसचिवपदी सुजाता गाडगीळ यांची निवड
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/12/2024 :
सोलापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माळशिरस तालुका संघटक सहसचिव पदी सुजाता गाडगीळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माळशिरस मधील संत सावतामाळी मंगल कार्यालय येथे झालेल्या पगारवाढ आनंदी मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड व सोलापूर जिल्हा सरचिटणीस सरला ताई चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली. यावेळी माढा तालुका अध्यक्ष हेमा ताई गव्हाणे,वर्षा सटाळे, सांगली जिल्हा अध्यक्ष आनंदी भोसले, उपाध्यक्ष नदीरा नदाफ, वर्षा भोसले, माळशिरस तालुका अध्यक्ष अनिता सावळकर, उपाध्यक्ष कमल ठोंबरे, ममताबी काझी, जयश्री काटे, माधुरी मोरे सर्व पदाधिकारी, माळशिरस तालुक्यातील सर्व बीट प्रमुख सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस कार्यक्रमास उपस्थित होत्या. यावेळी सरला ताई चाबुकस्वार बोलताना म्हणाल्या कि अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमध्ये त्याचबरोबर कोरोनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली व जनतेची सेवा केलेली आहे. यांची दखल घेऊन राज्य शासनाने पगार वाढ केलेली आहे यापुढेही सर्व कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद काम करावे काही अडचण असल्या संघटनेची संपर्क साधावा असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे.
यावेळी नूतन संघटक सहसचिव सुजाता गाडगीळ यांचा सत्कार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गाडगीळ म्हणाल्या की मी गेले कित्येक वर्ष संघटनेचे सदस्य म्हणून काम करत असताना महिलांच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे संघटनेने माझ्यावर संघटक सहसचिव पदाची टाकलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे प्रियंका माने पाटील यांनी केले व आभार प्रदर्शनअनिता सावळकर यांनी केले.