विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 20/12/2024 : तुम्ही निसर्गाचे जरा बारकाईने निरीक्षण केलेत का? म्हणजे वृक्ष आपल्याला फळे-फुले, सावली व बरेच काही देतात. सूर्य दिवस तर चंद्र रात्री प्रकाश देतो, नद्या पाणी देतात तर धरती, वारा, उन, पाऊस नव जीवन देतात. हे सर्व अविरत चालू आहे व असेच चालू राहणार आहे.
यांनी कधी आपल्याकडून परतफेडीची अपेक्षा केली का? बदली आपल्याकडून काही घेतले का? परतफेड करा म्हणाले का? नाही ना? मग आपण माणसेच का परतफेडीची अपेक्षा करतो? कोणासाठी काही केले की त्याने पण आपल्यासाठी काही करावे हा आपला आग्रह असतो.
आपण निसर्गाकडून काही शिकवण घेऊ. निरपेक्ष देत राहू. परतफेडीची अपेक्षा नाही. आपल्यासाठी कोणी काही करतात त्यांच्याशी कृतज्ञ राहू व आपल्याला जमेल तसे इतरांसाठी निरपेक्षपणे काही करत राहू.
जयहिंद!🇮🇳
_- सौ. स्नेहलता स. जगताप._