ताज्या घडामोडी

शिंका येणे

शिंका येणे

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 21 डिसेंबर 2024 :

१. शिंकेमुळे ह्रदयाकडून मेंदुकडे व पोटाकडे अचानक जोराचा दाब दिला जातो या दाबामुळे सर्वांगातील रक्तदाब जोराने हे झटका देऊन ढकलला जातो. याचा चांगला परिणाम रक्त प्रवाहावर होऊन रक्त वाहिन्या चांगल्याप्रकारे कार्यान्वित होतात व डोके हलके होते.
२. पुर्वी लोक शिंका येण्यासाठी नाकात तपकीर ओढून कृत्रिम प्रकारे शिंका आणत होते व डोके हलके करत होते.
३. आता शिंक येणे चुकीचे समजून लोक ‘साॅरी’ म्हणतात पण ती नैसर्गिक क्रीया आहे.
४. दैनंदीन जीवनात ह्रदयविकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कमी आहे कारण स्त्रिया स्वपांक करतेवेळी किंवा घराची साफ सफाई करतेवेळी शिंकण्याचे कार्य सतत करत असतात. मात्र ज्या स्रियांचे शिंकण्याचे प्रमाण कमी आहे त्यांची तब्येत अकारण स्थूल होते. शिंकेमुळे पोटावर प्रचंड दाब येतो व पोटाचे स्नायू आकुंचित केले जातात व त्यामुळे कपालभातीचा योग पूर्ण होतो.
५. नित्य नियमाने सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना या दोन वेळेस शिंक येण्यासाठी उपाय केले तर शरीर सतत निरोगी तर राहतेच शिवाय पोटाचे व डोक्याचे दुखणे कायमचे बंद होते.
६. कृत्रिम शिंका येणेसाठी नाकात स्वच्छ धागा फिरवला तर शिंका सहज येतात ह्यासाठी तपकीर वापरणेची गरज नाही.
७. शिंकेमुळे नाक व घसा सतत स्वच्छ राहतो तसेच मनातील ताणतणाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्रदयविकार होऊ नये ह्यावर देखील हा रामबाण उपाय आहे. निसर्ग उपचार पद्धतीमध्ये ही क्रिया दिलेली आहे.
८. अभ्यास करतांना झोप येत असेल तरीही शिंका काढल्यास पुढील दोन तास डोके तरतरीत राहते व झोप येणे थांबते.
९. शिंकामुळे चेहरा थोडासा लालसर होतो व डोळ्यात पाणी येते हे सुध्दा आरोग्यवर्धक आहे. चेहरा उजळतो व डोळे स्वच्छ होतात.
१०. शिंकेमुळे डोक्यातील विचार चक्र खंडित होते व पुन्हा नविन विचारचक्र सुरू होतांना मेंदुला नवचैतन्य निर्माण होते.
११. सतत सर्दी होत असेल तर ती शिंकांमुळे. काही काळाने अशी सततची सर्दी थांबते.
अशा अनेक उपयुक्त बाबींशी शिंकांचा संबध आहे……
अचानक येणारी व थांबवता न येणारी शिंक ही सजीवास ईश्वरी देणगीच आहे.

प्रमोद पाठक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button