पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घ्यावा – संजय वाघमोडे

पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घ्यावा – संजय वाघमोडे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 03/05/2025 :
राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ सुशिक्षित बेरोजगार युवकांनी घ्यावा असे आवाहन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यपाल नियुक्त सदस्य, संजय वाघमोडे यांनी केले आहे.
योजना विषयी माहिती – विविध योजना व उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कठिबध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनांमध्ये गेली सात वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. सन २०२१-२२ पासून जिल्हास्तरीय पशुसंवर्धन विषयक विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.
यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्याच दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये. यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी सर २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतीक्षा यादीतील क्रमांका नुसार अंदाजे केंव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबी करता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वापर करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षाच्या संगमनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलाचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२५-२६ या वर्षात राबवली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळी पालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक /शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक /युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आव्हान पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https //ah.mahabms.com अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन नाव AH – MAHABMS Google Play Store वरील मोबाईल अँप वर उपलब्ध अर्ज करण्याचा कालावधी २/५/२०२५ ते १/६/२०२५, टोल फ्री क्रमांक १९६२ वेळ : सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते सायंकाळी ६
अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनांचे संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲप वर उपलब्ध आहे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावे लागेल आणि बहुतांश माहिती बाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा अर्ज भरताना अर्जदाराने नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावरच अर्जाच्या स्थितीबाबत संदेश मेसेज पाठवण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजना अंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. व मागील वर्षे अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात दर्शवलेल्या टोल फ्री क्रमांक वर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा असे आव्हान पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.
नव्याने पूर्ण जिल्हास्तरीय लाभार्थी साठी ah.mahabms.com या प्रणालीद्वारे ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवणे २०२५ – २६ वेळापत्रक
३ मे २०२५ ते २ जून २०२५ ऑनलाइन अर्ज स्वीकारणे, ३ जून २०२५ ते ७ जून २०२५ रँडमायझेशन पद्धतीने लाभार्थी प्राथमिक निवड, ८ ते १५ जून २०२५ मागील वर्षी तसेच यावर्षीच्या लाभार्थी मार्फत कागदपत्रे अपलोड करणे, १६ ते २४ जून २०२५ पशुधन विकास अधिकारी विस्तार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करून निवडणूक पूर्ण करणे, २५ ते २७ जून २०२५ लाभार्थी मार्फत कागद पत्रातील त्रुटी पूर्तता, २८ ते ३० जून २०२५ कागदपत्रे अंतिम पडताळणी, १ जुलै २०२५ , राखीव, २ जुलै २०२५ अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार करणे, या वेळापत्रकानुसार योजनांची कार्यवाही होणार आहे तरी बेरोजगार युवक युवती या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच हि योजना सर्वांना साठी आहे.