रत्नत्रय इंग्लिश मिडीयम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे मध्ये महाराष्ट्र दिन साजरा

रत्नत्रय इंग्लिश मिडीयम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे मध्ये महाराष्ट्र दिन साजरा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 02/05/2025 :
रत्नत्रय इंग्लिश मिडीयम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे मध्ये 1 मे महाराष्ट्र दिन व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री व सौ. डॉ सुनेत्रा सतिश दोशी ( सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ अकलूज) या उभयतांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी यांनी भूषवले, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या सौ.सुप्रभा रविंद्र डुडू. सौ मोनिका विरेंद्र डुडू श्रीमती माधुरी डुडू यांच्या हस्ते 1st To 3rd ( CBSE midium) Nursery To 9th ( English Medium) तसेच पहिली ते अकरावी सेमी माध्यम मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ सतीश दोशी यांनी मोबाईल मुळे संपत चाललेला माणसा माणसातील संवाद यावर मार्गदर्शन केले.मोनीका डुडू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी , मार्गदर्शक व सदाशिवनगर चे सरपंच विरकुमार दोशी , संचालक महावीर शहा, सनदकुमार दोशी , संस्थेचे सचिव प्रमोद दोशी, सीबीएसई च्या चेअरमन पुनम दोशी, नातेपुते स्कूलचे सभापती वैभव शहा , सुरेश धाईंजे, संचालिका भाग्यश्री दोशी ,सारीका राऊत व सर्व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक दैवत वाघमोडे यांनी केले सूत्रसंचालन मोहिते व आभार प्रदर्शन देसाई यांनी केले.