अकलूज येथे श्री संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

अकलूज येथे श्री संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली येथून
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 12/02/2025 :
श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648 वी जयंती अकलूज मध्ये विविध धार्मिक सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.
जयंती सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक 12.2.2025 रोजी सकाळपासून नामस्मरण, भजन, प्रवचन, पुष्पवृष्टी, महाआरती घेण्यात आली. याप्रसंगी अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले, वीरशैव समाज संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत शेटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डी जी कांबळे, परीट समाज संघटनेचे कार्याध्यक्ष शांतीलाल कारंडे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी सुरेश देशपांडे, ॲड भारत गोरवे, अकलूज येथील डॉ संतोष खडतरे, डॉ दिलीप गुजर माळशिरस तालुका आयएमएचे अध्यक्ष डॉ संजय सिद या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर सोहळ्यामध्ये सुहास उरवणे यांनी रविदास महाराजांचे विचार व शिकवण यावर प्रबोधन केले. आज समाजातील अनेक मुलं मुली उच्च विद्याविभूषित असून अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत ही गोष्ट समाजासाठी अभिमानाची आहे.
जयंती सोहळ्याच्या निमित्ताने अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय किशोर सिंह माने पाटील यांनी आपल्या मनोगतात समाजाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले व श्री संत रविदास महाराज यांचा जयंती सोहळा अतिशय शिस्तबद्ध व समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन साजरा केला जातो. ही बाब अतिशय उल्लेखनीय आहे असे म्हटले.
जयंती निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील सेवानिवृत्त, सेवा बढती,शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रामध्ये नैपुण्य प्राप्त व्यक्तींचा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
जयंती निमित्त रोहिदास शंकर कांबळे व सौ रतन रोहिदास कांबळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जयंती सोहळा अकलूज येथील श्री लक्ष्मी बालाजी हॉल येथे संपन्न झाला. या कार्यालयाचे मालक आबासाहेब शिंदे यांनी सर्व सुविधा समाजासाठी विनामूल्य मोफत दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ दिलीप गुजर, आबासाहेब शिंदे, अशोक कांबळे, बाबुराव भगत, बंडू खडतरे, सुभाष शिंदे, मोहन भगत, गोपाळ मस्तुद, अशोक राजगुरू, नितीन लोखंडे ,महादेव राजगुरू, अनिल शिंदे, प्रदीप राजगुरू, हणमंत तेलसंग, चंद्रकांत राजगुरू,अशोक शिंदे, विनोद भगत, हरी विठ्ठल लोंढे, विलास शिंदे, डॉ शैलजा गुजर, संगीता खडतरे, विद्या शिंदे,मीना सुरवसे, वैशाली सातपुते, यांच्यासह समाजातील अनेकांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमास पेक्षा 800 पेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम गुजर यांनी तर आभार बंडू खडतरे यांनी केले.